News Flash

चित्रचाहूल : परिवर्तनाची मुहूर्तमेढ

झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत राधिकाने खटला जिंकल्याने आनंदाचे वातावरण आहे.

(संग्रहित छायाचित्र)

निलेश अडसूळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य के वळ एका विशिष्ट जाती किं वा समूहासाठी मर्यादित नसून अखंड भारताला मिळालेली ही परिवर्तनाची दीक्षा आहे. आणि हेच कार्य मालिकेच्या माध्यामातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेद्वारे उत्तम प्रकारे के ले जात आहे. आतापर्यंत मालिकेत  बाबासाहेबांचे बालपण, बालपणात बसलेले समाजातल्या अस्थिरतेचे चटके,  सवर्णाकडून दलितांवर झालेला अन्याय आणि त्यात पिचल्या गेलेल्या हरिजनांच्या व्यथा प्रेक्षकांनी पाहिल्या, परंतु ज्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाला खरे वळण मिळाले तो सत्याग्रह येत्या आठवडय़ात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

* चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील महत्त्वाचा लढा मानला जातो. रायगड जि’ाातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह के ला. हा लढा फक्त पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर ती सुरुवात होती मानवी मूलभूत हक्कांच्या चळवळीची. या घटनेनंतर समतेचे वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहू लागले. ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची मुहूर्तमेढ होती ज्याचे दूरगामी परिणाम सबंध भारतावर झाले. हा ऐतिहासिक प्रसंग येत्या काही भागांत प्रेक्षकांना दिसणार आहे. तर पुढील काळात बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा विशेष भाग म्हणजे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना दिलेली आदरांजली आहे, असे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर मराठीपाठोपाठ ‘अ‍ॅण्ड टीव्ही’ या हिंदी वाहिनीनेदेखील आंबेडकरांचे चरित्र सांगणाऱ्या मालिकेची निर्मिती केली आहे. ‘एक महानायक’ असे या मालिके चे शीर्षक असून १७ डिसेंबरपासून मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे.

* तर याच वाहिनीवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत नंदादेवींच्या विरोधात श्रुती बंड करणार असून प्रेक्षकांना नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. श्रुतीचे रघूसोबत लग्न लावून देण्याचे नंदादेवींचे कारस्थान श्रुतीसमोर उघड झाले आहे. श्रुतीवर अपार प्रेम करणारा युवराजही यात सामील असल्याने श्रुतीच्या मनात युवराजविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे. या फसवणूकीबाबत श्रुती नंदादेवींना जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर नंदादेवींच्या वर्चस्वालाही आव्हान देणार आहे. या संघर्षांत रघू आणि युवराज यांच्यापैकी श्रुतीच्या पाठीशी कोण उभं राहील हे आगामी भागात कळेलच.

* ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत राधिकाने खटला जिंकल्याने आनंदाचे वातावरण आहे. येत्या काही भागांत राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची गडबड सुरू झालेली दिसेल. परंतु, थाटामाटात लग्न करायला राधिकाने साफ नकार दिला असल्याने सौमित्रची आई आणि राधिका यांच्यात वाद होतील की लग्न निर्विघ्नपणे पार पडेल हे मात्र लवकरच कळेल. तर शनायाची ‘मम्मा’ परत आल्याने गुरूची काय नवी फजिती होणार हेही पाहता येणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सध्या लक्ष्मी आणि राणा या बापमुलीच्या नात्यावर लक्ष कें द्रित केलेले दिसते. आगामी भागात लक्ष्मीचे अपहरणनाटय़ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना उद्याची उत्कंठा लावणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेत माधवचे आगमन झाले आहे. घरातील एकंदर परिस्थिती पाहून भांबावलेल्या माधवला अण्णा आणि शेवंताच्या संबंधांविषयी समजते. आता अण्णा माधवचाही बळी घेणार की माधव अण्णांना शेवंतापासून दूर करणार हे मात्र प्रेक्षकांना आगामी भागात कळेल.

* मराठवाडय़ातील चार भावंडांची कथा असलेल्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिके त सुरुवातीपासून लग्न हा मुद्दा प्रकर्षांने पुढे आला आहे. अखेर या चारही भावंडांचे लग्न येणाऱ्या काही भागांत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे भालेरावांचे हे चार सुपुत्र काटेंच्या चार मुलींशी विवाहबद्ध होणार आहेत.  येणाऱ्या आगामी भागात या चार भावांचा विवाह सोहळा आणि भालेरावांच्या घरातील आनंद प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्थात लग्नात घडणाऱ्या गमतीजमती हे या भागांचे आकर्षण असेल.

* ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘स्वामिनी’ मालिके त येणाऱ्या काही भागांत चुलीपुढचे राजकारण अधिक तीव्रतेने समोर येताना दिसणार आहे. गोपिकाबाई आणि जानकीबाईंमध्ये झालेल्या भांडणाचे पडसाद आता संपूर्ण शनिवार वाडय़ावर पडताना दिसतील. तर माधवराव आता रमाबाईंच्या गावी गराडय़ाला गेल्याने रमा- माधवचे नव्याने उलगडणारे नाते प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिके त कोमात गेलेला शिवा पुन्हा कधी परतणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. आगामी भागात सिद्धीचा शिवाविषयी असलेला गैरसमज दूर होताना दिसेल. सोनू आणि सरकारचं लग्न मोडण्यासाठी सिद्धी आणि शिवा मिळून प्रयत्न करतील की पुन्हा आत्याबाई नवे खुसपट काढतील हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 4:04 am

Web Title: marathi serial transformation timeline abn 97
Next Stories
1 मुलं आणि पालकांच्या अपेक्षांची ‘बेरीज वजाबाकी’
2 बलात्काराच्या आरोपींना शिक्षेसाठी वेगवान कायदा हवा
3 नवाजुद्दीनच्या बहिणीने घेतला जगाचा निरोप; आठ वर्षे दिली कर्करोगाशी झुंज
Just Now!
X