लॉकडाउनच्या या स्थितीत सगळीकडेच कंटाळवाना दिवस झाला आहे. पण, करोनाच्या या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता आणण्यासाठी ठाणे आर्ट गिल्ड (टॅग) प्रस्तुत, सदानंद देशमुखांच्या कादंबरीवर आधारित सध्या गाजत असलेल्या ‘बारोमास’ या नाटकाची टीम पुढे सरसावली आहे.

उत्तम साहित्याचे अभिवाचन आणि त्याचा रसास्वाद हा माणसाला कितीही कठीण परिस्थितीत उभारी देऊ शकतो. हे जाणून, ठाणे आर्ट गिल्ड आणि लोकसत्ता डॉट कॉम ह्यांच्या सहकार्याने बारोमास टीमने एक नवीन उपक्रम ‘२१ दुणे ४२’ सुरू केला आहे. ह्या उपक्रमाअंतर्गत २१ दिवस रोज २ कथा याप्रमाणे उत्तम दर्जेदार अशा ४२ कथांचे अभिवाचन सुरू झाले आहे.

उदय सबनीस, सचिन खेडेकर, वासंती वर्तक, मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी, मंगेश देसाई, संपदा जोगळेकर कुळकर्णी, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, हेमांगी कवी, सुप्रिया विनोद, शिल्पा तुळसकर, सागर तळाशीकर, हर्षदा बोरकर असे मान्यवर आणि सोबत ठाणे आर्ट गिल्डचे अभिवाचक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, रत्नाकर मतकरी, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, मंगला गोडबोले, जयवंत दळवी, डॉ.सोनाली लोहार, इरावती कर्वे, संपदा जोगळेकर कुळकर्णी, दिलीप प्रभावळकर, मेघना पेठे, किरण येले, सदानंद देशमुख अश्या अनेक उत्तमोत्तम साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येईल.

आजचे अभिवाचक : लीना भागवत (कथा : कडू आणि गोड, लेखक : गंगाधर गाडगीळ ) आणि अमृता मोडक (कथा : आरण्यकाची जन्मकथा , लेखक : गंगाधर गाडगीळ).

 

मग येताय ना ऑनलाइन अभिवाचनाला…

आज संध्याकाळी ७:३० वाजता खालील लिंकवर 

https://www.facebook.com/natakbaromaas/

शेअर करा – फॉलो करा

https://www.facebook.com/natakbaromaas/