News Flash

‘माझे पती सौभाग्यवती’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

त्याऐवजी सुरु होणा-या नव्या मालिकेचा प्रोमो येथे पाहा.

‘माझे पती सौभाग्यवती’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

वैभव मांगले या हरहुन्नरी कलाकाराने स्त्री व्यक्तिरेखा साकारलेली ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका जुलै महिन्यात संपणार असून त्याऐवजी एक नवी मालिका तुमच्या भेटीला येईल.
गेल्यावर्षी २८ सप्टेंबरला ‘माझे पती सौभाग्यवती’ ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेची कथा एका स्ट्रगलर अभिनेत्याची होती. यात वैभव मांगलेने दोन व्यक्तीरेखा साकारलेल्या आहेत. एक म्हणजे वैभव आणि दुसरी व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मीची. तर वैभवच्या पत्नीची भूमिका नंदिता धुरी हिने साकारली आहे.  दरम्यान, वैभवला नक्की कोणती चिंता सतावतेय असा प्रश्न त्याच्या पत्नीला पडला असून ती त्याचा शोध घेतेय. अशी कथा सध्या मालिकेत सुरु आहे. याचा अर्थ काही दिवसातच वैभवच्या पत्नीला सर्व सत्य कळेल आणि त्याचे खरे रुपही लोकांसमोर येईल. यावर मालिकेचा शेवट होईल.
‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका जरी तुमचा निरोप घेत असली तरी येत्या १८ जूलैपासून रात्री ८.३० वा. ‘खुलता कळी खुलेना’ ही नवीन मालिका तुमच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच लॉन्च करण्यात आला. या मालिकेत ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख ही नवी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. प्रोमो पाहता ही मालिका प्रेमावर आधारित असलेले याबाबत काही शंकना नाही. काही नात्यांना नाव नसतं ही या मालिकेची टॅग लाईन असून याची कथा काय असेल याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 9:37 am

Web Title: mazhe pati saubhagyavati seerial on zee marathi says goodbye to viewrs
Next Stories
1 व्यक्तिरेखेची गरज म्हणून मी ‘ती’ दृश्ये दिली – नेहा महाजन
2 पुरुष व्यक्तिरेखांच्या शिवराळ भाषेला सेन्सॉर कात्री लावत नाही – स्वस्तिका मुखर्जी
3 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सलमान आणि अनुष्का!
Just Now!
X