News Flash

अरे ही तर ‘सेम टु सेम’ प्रियांका चोप्राच!

जगात तुमच्या चेहऱ्याशी मिळती जुळती सात माणसं असतात असं तुम्ही कधीतरी ऐकलं, वाचलं असेलच. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वक्तीसारखे हुबेहुब दिसणारे लोक आपल्या समोर

जगात तुमच्या चेहऱ्याशी मिळती जुळती सात माणसं असतात असं तुम्ही कधीतरी ऐकलं, वाचलं असेलच. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वक्तीसारखे हुबेहुब दिसणारे लोक आपल्या समोर येतात. त्यातून सेलिब्रिटींसारखे दिसणारे व्यक्ती तर अनेकदा आपल्याला सोशल मीडियावर या ना त्या माध्यमातून दिसत असतात. सध्या प्रियांका चोप्रासारख्या तंतोतंत दिसणाऱ्या एका मॉडेलची चर्चा आहे. ही मॉडेल मुळची न्यूयॉर्कची असून तिचे प्रियांकाच्या चेहऱ्याशी असलेलं साधर्म्य पाहून अनेकांनी तिला प्रियकांची जुळी बहिण असंच नाव दिलं आहे.

मेगन मिलान असं या मॉडेलचं नाव आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर केले. तिचे काही फोटो हे प्रियांकाशी मिळते जुळते असल्याचं अनेकांनी तिच्या निदर्शनास आणून दिलं. मग काय अल्पवाधीत मेगन प्रियाकांची जुळी बहिण नावानं सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ लागली. पण प्रियांका चोप्रासारखी दिसणारी ही काही पहिलीच व्यक्ती नाही. गेल्यावर्षात प्रियांका सारखा दिसणारा आणखी एक चेहरा प्रकाशझोतात आला होता. नवप्रीत बांगा असं तिचं नाव होतं. नवप्रीत ही युट्युबर आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोत आणि प्रियांकाच्या फोटोत बरंच साम्य असल्याचं अनेकांच्या नजरेतून चुकलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 12:30 pm

Web Title: megan milan a popular model in new york just looklike a priyanka chopra
Next Stories
1 ‘आरजे’च्या रुपात गप्पा मारण्यासाठी तेजश्री प्रधान सज्ज
2 दास्तान-ए-मधुबाला भाग १०
3 VIDEO : डरना जरूरी है! अनुष्काने साकारलेली ‘परी’ पाहून पुन्हा धडकीच भरेल
Just Now!
X