मिलिंद सोमण त्याच्या ‘फिटनेस गोल्स’ आणि ‘हेल्दी लाइफस्टाइल’साठी ओळखला जातो. रोज व्यायाम, सकस आणि साधा आहार, नियमीत धावणं असे अनेक फिटनेस गोल त्यानं तरुणाईला दिले आहेत. पंन्नाशी ओलांडलेल्या मिलिंदची हेल्दी लाईफस्टाइल पंचवीशीच्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. नुकताच मिलिंद त्याची प्रेयसी अंकिता कोणवारसोबत विवाहबंधनात अडकला. अर्थात मलिंदपेक्षा वयानं अंकिता खूपच लहान असल्यानं मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाचा विषय सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय जास्त ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण ‘कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना’ असं म्हणतं या दोघांनी आपल्याबद्दल चर्चिल्या जाणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केला. अलिबागमधल्या फार्म हाऊसमध्ये हे जोडपं विवाहबंधनात अडकलं. लग्नानंतर दोन दिवसांत त्यांनी एक स्तुत्य उपक्रम पूर्ण केला. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांच्या नावे या दोघांनी वृक्षारोपण केलं आहे. मिलिंदनं वृक्षारोपणाचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. निसर्ग ही तुम्हाला मिळालेली देणगी आहे, लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या आठवणीसाठी एक झाड लावत आहे, आतापर्यंत ११ रोपटी लावून झालीत असं म्हणत पत्नी अंकितासोबत मिलिंदनं हा फोटो शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind soman and ankita konwar plant a tree for every guest who attended their wedding
First published on: 25-04-2018 at 11:23 IST