बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यहां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बचना ऐ हसीनों’, ‘हनीमून ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड’ आणि ‘वेल डन अब्बा’ या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर २०१५मध्ये मिनिषाने रयान थामशी लग्न केले. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी जवळपास पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता मिनिषा एका व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

मिनिषाने नुकाताच एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला रिलेशनशीप बद्दल विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘हो, मी एका व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे’ असा खुलासा केला. पण मिनिषा कोणासोबत रिलेशनमध्ये हे तिने सांगितलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये मिनिषा कोणाला डेट करते जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

आणखी वाचा : ‘…तर त्यातून बाहेर पडणेच योग्य’, घटस्फोटावर मिनिषा लांबाचा खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Minissha (@minissha_lamba)

गेल्या काही दिवसांपासून मिनिषा चित्रपटांपासून लांब आहे. ती सध्या ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. ती ‘बिग बॉस ८’मध्ये सहभागी झाली होती. या विषयी बोलताना ती म्हणाली, ‘मला नेहमी टेलिव्हिजन माध्यमात काम करण्याची इच्छा होती. जेव्हा संधी मिळली तेव्हा मी काम केले. मला अनेक ऑफर्स येतात पण मी त्यांना नकार दिला आहे. मी योग्य संधीची वाट पाहात आहे’ असे मिनिषा म्हणाली.