18 January 2019

News Flash

गरोदरपणात मीरा राजपूतला होतोय ‘हा’ मनस्ताप

सध्या शाहिद आणि मीरा कुठेही दिसले तरी लोकांच्या नजरा शाहिदवर कमी आणि मीरावच जास्त खिळून असतात

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. शाहिदने तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी त्याच्या इन्स्टग्रामवर शेअर केली होती. सध्या शाहिद आणि मीरा कुठेही दिसले तरी लोकांच्या नजरा शाहिदवर कमी आणि मीरावच जास्त खिळून असतात. नेमकी याच कारणामुळे मीरा सध्या फार त्रासली आहे. त्याचे झाले असे की, आता मीरा राजपूतचे बेबी बंप दिसण्यात येत आहे. त्यामुळे मीराला तिचे जुने कपडे घालता येत नाहीत आणि मॅटर्निटीचे जे कपडे असतात ते सध्या तिला फार मोठे होते आहेत. यावर उपाय म्हणून सध्या मीराला सैल कपडेच घालावे लागत आहेत.

मीराने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसमध्ये लिहिले आहे की, सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला तुमची जीन्स होत नाही आणि मॅटर्निटीची जीन्स फारच मोठी होते. या स्टेटससोबत तिने संभ्रमात असलेली इमोजीही टाकली आहे. मीरा आणि शाहिद यांना नुकतेच सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पाहण्यात आले होते. यावेळीही मीराने पांढऱ्या रंगाचा सैल डिझायनर ड्रेस घातला होता.

View this post on Instagram

💝🎈

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

७ जुलै २०१५ मध्ये शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. २६ ऑगस्ट २०१६ मध्ये मीरा- शाहिदला पहिली मुलगी झाली. या मुलीचे नाव त्यांनी दोघांच्या आद्याक्षरावरून मीशा असे ठेवले. शाहिदच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, बत्ती गुल मीटर चालू या सिनेमाच्या चित्रीकरणात तो सध्या व्यग्र आहे. या वर्षी ३१ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार असे म्हटले जात आहे. या वर्षात आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. सिनेमात त्याने राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारली होती.

First Published on May 16, 2018 5:02 pm

Web Title: mira rajput in trouble after her second pregnancy share a post on instagram