एखादं स्वप्न बघितलं की ते पूर्ण करण्याचंही आपण स्वप्न बघतो. अशाच एका स्वप्नाची कहाणी एका वेब सीरिजमध्ये बघायला मिळते. मीराचं स्वप्न पूर्ण होण्याची गोष्ट बघायची असेल तर ‘गर्ल इन द सिटी’ ही वेब सीरिज जरूर पाहा.

स्वप्न सगळेच बघतात. कोणी परदेशी शिक्षण घेण्याचं स्वप्न बघतं, कोणी घर घेण्याचं स्वप्न बघतं, कोणी स्वत:चा बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न बघतं तर कोणी मोठी गाडी विकत घेण्याचं स्वप्न बघतं. असंच एक स्वप्न मीरा सेहगल बघते. ही मीरा डेहराडूनची राहणारी. फॅशन डिझायनर होण्याचं तिचं स्वप्न आहे. ती एका आर्मीमध्ये असणाऱ्या माणसाची मुलगी आहे. त्यामुळे खरं तर तिला कशाचीही कमी नाही. तिचे वडील तिला डेहराडूनमध्ये एक बुटीकही सुरू करून देतात. ‘तुला हवं ते इथे कर’ असं सांगून तिला डेहराडून सोडून कुठेही जायचं नाही असंही सांगतात. पण मीरा स्वप्न बघणारी मुलगी. ती तिच्या वडिलांकडून तीन महिन्यांची मुदत मागते. या तीन महिन्यांसाठी मुंबईतल्या एका नावाजलेल्या फॅशन हाऊसमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी ती तिथे जाते आणि सुरू होतो मीराचा मुंबई शहरातला प्रवास! हा प्रवास म्हणजे ‘गर्ल इन द सिटी’ ही वेब सीरिज. विषय अगदी साधा, सहज आहे. पण तरी वेगवेगळ्या मजेशीर घटकांनी तो मनोरंजक केला आहे. ही सीरिज इतकी लोकप्रिय झाली की तिचा दुसरा भागही आला आणि तोही नुकताच संपला.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”

संयुक्ता चावला शेख लिखित आणि समर इक्बाल दिग्दíशत ‘गर्ल इन द सिटी’ ही वेब सीरिज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हवं तसं करिअर करू पाहणाऱ्या तरुणाईचं प्रतिनिधित्व ही सीरिज करते. मीराचं मुंबईत येऊन इंटर्नशिप करणं, मुंबई या मोठय़ा शहराला समजून घेणं, कामाच्या नव्या ठिकाणी जमवून घेणं, या प्रवासात नव्या लोकांना भेटणं, त्यांना जाणून घेणं, नातेसंबंध जपणं, करिअर सेट करताना येणाऱ्या अडथळ्यांना हुशारीने सामोरं जाणं असं सगळंच या सीरिजमध्ये उत्तम रेखाटलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त उठून दिसते ती सीरिजची नायिका मीरा म्हणजे मिथिला पालकर. मिथिलाने पहिल्या भागात मुंबईत पहिल्यांदा आलेली, काहीशी गोंधळलेली, इंटर्न असल्यामुळे सगळं गपगुमान ऐकून घेणारी मीरा अतिशय अचूक रेखाटली आहे. तर मिथिलाने दुसऱ्या भागात विचारांनी प्रगल्भ झालेली मीरा उत्तम साकारली आहे. मिथिलाचं कािस्टग इथे एकदम करेक्ट झालंय असं म्हणायला हरकत नाही.

कोणताही तरुण किंवा तरुणी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करायला मिळणार असेल तर जीवाचं अगदी रान करतात. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यामागे ते धावत असतात. त्यांच्या कामात जराही चूक होणार नाही यासाठी आटापिटा करत असतात. पण त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण करणारेही अनेक असतात. अशांना योग्य त्या प्रकारे हाताळणं ही त्यांची आणखी मोठी जबाबदारी असते. हे चित्र खऱ्या आयुष्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. हेच चित्र हुबेहुब गर्ल इन सिटीमध्येही दिसतं. या सीरिजच्या पहिल्या भागात मीरा इंटर्न म्हणून प्रचंड स्ट्रगल करते. तिच्यात फॅशन डिझायनर होण्याची क्षमता आहे. पण तिच्या ऑफिसातली मोठय़ा पदावर असलेली एक स्त्री तिला काही केल्या पुढे जाऊ देत नाही. मीराने केलेल्या डिझाइन्स स्वत: केल्या असं सांगून त्याचं श्रेय मिळवते. इंटर्न असल्यामुळे मीराला याबद्दल काही बोलताही येत नाही. ती खचते आणि पुन्हा नव्याने उभी राहते.

गर्ल इन द सिटीच्या दोन्ही सीझनमधल्या कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. नेमून दिलेलं काम प्रत्येकाने चोख केलं आहे. अभिनयाचा कोणताही आव आणलेला दिसत नाही, ओढूनताणून केलेला अभिनयही नाही. अगदी सहज साधा अभिनय यामध्ये दिसतो. मग तो दोन मिनिटांच्या प्रसंगासाठी पहिल्या सीझनमधला मीराची पर्स चोरणारा चोर असो, त्या सीझनमधला वॉचमन असो किंवा टॅक्सी ड्रायव्हर असो. सगळ्यांनी काम अगदी चोख केली आहेत. दुसऱ्या सीझनमधल्या अरीम साकारलेल्या प्रीतिक चावलाची दखल घ्यावी लागेल. प्रचंड शिष्ट, श्रीमंतीचा माज, कामचुकार अशी अरीम प्रीतिकने उत्तम साकारली आहे. करणवीर शर्मा (किरण), रजत बरमेचा (काíतक), गरवील मोहन (यश) यांनीही दुसऱ्या सीझनमध्ये आपापल्या व्यक्तिरेखांची मागणी पूर्ण केली आहे. मीराच्या तोंडी एक वाक्य नेहमी असतं. ‘आय अ‍ॅम अ फौजी किड’, ‘फौजी की बेटी हू मं’ हे सांगताना त्या व्यक्तिरेखेत येणारी ताकद प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचते.

ही सीरिज तरुणांमध्ये लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्यातल्या अनेक गोष्टी तरुणांच्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करतात. स्वप्न बघणं, ते पूर्ण करण्यासाठी धडपड करणं, त्यासाठी कधी कधी घरच्यांचा असलेला विरोध, घर सोडून दुसऱ्या शहरात येऊन राहण्याची तयारी असणं, नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करणं, ऑफिसातल्या राजकारणाला हाताळणं अशा अनेक गोष्टी तरुणांच्या आयुष्यात घडत असतात. याचं चित्रण सीरिजमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसतं. आजची तरुण पिढी काही गोष्टी किती सहज हाताळते आणि काहींचा किती ताण घेते हेही यात बघायला मिळतं. दोन्ही सीझनमध्ये बॉस आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी मीराला जमवून घ्यावं लागतं. दोन्ही सीझनमध्ये हा समान धागा आहे. फरक इतकाच की पहिल्या सीझनमध्ये मीरा इंटर्न असते आणि दुसऱ्या सीझनमध्ये एक फॅशन डिझायनर म्हणून काम करत असते. या दोन्ही सीझनमधली मीरा ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर लिहिली आहे. पहिल्या सीझनपासून दुसऱ्या सीझनपर्यंतचा मीराचा प्रवास भन्नाट आहे.

सीरिज लोकप्रिय होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे सीरिजचं लेखन. संयुक्ता चावला शेख हिने या सीरिजचे दोन्ही सीझन लिहिले आहेत. तिच्या लिखाणात एक प्रवाह आहे. सीरिज अशी असते की मालिकेसारखी लांबवता येत नाही आणि सिनेमाइतका आवाका नसतो. त्यामुळे या दोन्हीचा मध्य साधायची कसरत लेखकाकडे असते. ती संयुक्ताला चांगली जमली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा लिहिताना त्यातले महत्त्वाचे पलू तिने चांगले हेरले आहेत. मीराचं मदत करणं, खंबीर उभं राहणं, अरीमचा हेकेखोरपणा, किरणचं इकडे आड तिकडे विहीर सारखी स्थिती, काíतकची हतबलता, मीराच्या बाबांच्या मनात असलेला राग आणि काळजी असं प्रत्येकाची ओळख दर्शवणारं लेखन तिला खूप चांगलं जमलं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वत:चा असा एक प्रवास संपूर्ण सीरिजमध्ये जाणवतो. सीरिज कुठेही तुटल्यासारखी वाटत नाही. सगळ्या प्रसंगांमध्ये सलगता आहे. प्रत्येक भागाचा शेवट पुढच्या भागाची कुतूहल, उत्सुकता वाटावा असा आहे.

प्रेक्षकांना खिळवून कसं ठेवता येईल याबाबत संयुक्ताने नक्कीच विचार केलेला दिसून येतो. लेखनाची भाषा फार अलंकारिक, पुस्तकी नाही. तशी अपेक्षितही नाही. अगदी साधी, सहज आजच्या तरुणाईची भाषा आहे. संयुक्ताच्या लिखाणाला साथ मिळाली ती समर इक्बाल या दिग्दर्शकाची. कलाकारांकडून अचूक अभिनय काढून घेण्याचं त्याचं कौशल्य दिसून येतं. काही प्रसंगांमध्ये काहींना संवादच नाहीत. पण त्याच प्रसंगातून बरंच काही सांगितलं गेलं आहे. यात कलाकाराचं कौशल्य आहेच पण त्याचबरोबर ते दिग्दर्शकाचंही श्रेय आहे. लेखक आणि दिग्दर्शकाची ही जोडी पहिल्या सीझनलाही एकत्र होती. त्यामुळे त्यावेळची त्यांची केमिस्ट्री दुसऱ्या सीझनमध्येही बघायला मिळते.
सीरिजचं नावंही एकदम अचूक आहे. मुंबई शहरात फॅशन डिझायनर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या मीराचा प्रवास ही अशी एका ओळीतली ही कथा आहे. ही कथा सीरिजच्या शीर्षकात एकदम फिट बसते. पहिल्या सीझनचा शेवटही उत्सुकता वाढवणारा आणि ‘आता पुढे काय होईल’ अशी भावना मनात निर्माण करणारा होता. तसंच दुसऱ्या सीझनच्या बाबतीतही झालं. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनबाबत कुतूहल निर्माण झालं आहे. दुसऱ्या सीझनमध्ये एका एपिसोडने प्रेक्षकांना जबरदस्त धक्का दिला होता. किरणचा झालेला अपघात. हा अपघाताचा प्रसंग एका भागाच्या शेवटी होता. पुढच्या भागात काय घडणार हे दाखवताना त्यात किरणचा मृत्यू झाला असं स्पष्ट दिसतं. त्यामुळे त्या अपघाताच्या भागानंतर या सीरिजच्या प्रेक्षकांमध्ये या एका धक्का देणाऱ्या टिवस्टची बरीच चर्चा रंगली होती. ‘अरे का मारलं किरणला’, ‘तो तर हिरो होता’ वगरे प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण, त्यानंतरचा भाग प्रदíशत झाल्यानंतर याच चाहत्यांमध्ये ‘हुश्श’ करणारं फििलग आलं. ही सीरिज डोक्याला ताण देणारी, गंभीर, गुंतागुंतीची, कारस्थानं असणारी अजिबात नाही. तर साधी, सुटसुटीत, मनोरंजक, हलकीफुलकी आहे. यात विनोद, रोमान्स, ड्रामा, गाणी आहेत. चांगल्या वेब सीरिजच्या रांगेत या सीरिजचं नाव घ्यायलाच हवं! यी सीरिजचे दोन्ही सीझन एकदम भन्नाट झाले आहेत. आता उत्सुकता वाढलीये ती याच्या तिसऱ्या सीझनची!

चैताली जोशी – @chaijoshi11

response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा