29 September 2020

News Flash

संजय राऊत यांच्याविरोधात मनसे आक्रमक, ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरवरुन खोडलं नाव

कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत आपला निषेध नोंदवला

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रंगलेल्या मानापमान नाट्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना टॉकीजबाहेर आंदोलन करत ठाकरे चित्रपटाच्या पोस्टवरुन संजय राऊत यांचं नाव खोडत आपला निषेध नोंदवला. संजय राऊत ठाकरे चित्रपटाचे निर्माते आहेत. महत्त्वाचं म्हणजे वादानंतर केलेलं ट्विट संजय राऊत यांनी डिलीट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असं म्हटलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती.

‘अपमान करण्याला लाथ कशी मारावी तुझ्याकडून शिकावं’

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान बुधवारी रात्री दिग्दर्शक अभिजित पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता. दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरू असताना तडकाफडकी उठून गेले. अपमानित झाल्याने पानसे हे तेथून उठून गेल्याचे सांगण्यात येते. सिनेमागृहाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच संजय राऊत आणि पानसे यांच्यात वाद झाला. यानंतर पानसे कुटुंबासह तिथून निघून गेले. या वादाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिजित पानसे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून ते सध्या मनसेत सक्रीय होते. अभिजित पानसे हे पूर्वी शिवसेनेत होते. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदही त्यांच्याकडे होते. मात्र, शिवसेना पक्षश्रेष्ठींवर नाराज झाल्याने ते मनसेत गेले. स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या वादानंतर मनसेचे नेतेही पानसे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या चित्रपटामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 4:43 pm

Web Title: mns activist erase sanjay raut name from thackeray poster
Next Stories
1 गँग्स ऑफ वासेपूरची संगीतकार स्नेहा खानवलकर अडकली विवाहबंधनात
2 उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’
3 Luka Chuppi Trailer : लग्नाआधी कार्तिक-कृतीची ‘लुका छुप्पी’
Just Now!
X