कुठल्याही क्षेत्रातील सेलिब्रिटी कितीही मोठा सुपरस्टार असला तरी त्याच्या करिअरमध्ये एक वेळ अशी येतेच जेव्हा त्याच्या कामगिरीचा आलेख हळूहळू खाली जाऊ लगातो. अगदी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. ७०-८०च्या दशकात सुपरहिट चित्रपट देणाऱ्या बिग बींच्या करिअरमध्ये ९०चं दशक काहीसं अपयश देणारं ठरलं.

अवश्य पाहा – IPLसाठी किंग खानच्या ‘सुहाना’ची खास तयारी; पाहा तिचे व्हायरल झालेले फोटो

Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!

‘इन्सानियत’, ‘मृत्यूदाता’, ‘सुर्यवंशम’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘कोहराम’ असे काही लागोपाट फ्लॉप चित्रपट अमिताभ यांनी दिले होते. त्यावेळी ताज्या दामाच्या अभिनेत्यांसमोर बिग बींची जादू काहीशी फिकी पडत होती. त्याच दरम्यान त्यांनी चित्रपट निर्मिती करणाऱ्या एका कंपनीची सुरुवात केली होती. परंतु ही कंपनी देखील फारशी चालली नाही. परिणामी फ्लॉप चित्रपटांसोबतच बिग बी आर्थिक संकटातही सापडले होते.

अवश्य पाहा – महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?; महेश टिळेकरांचा जान कुमारला संतप्त सवाल

अशा प्रतिकूल परिस्थितीत असतानाच त्यांना ‘मोहब्बतें’ या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. या चित्रपटात त्यांनी नारायण शंकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. जबरदस्त गाणी, कथानक आणि अफलातून अभिनय यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. आज २० वर्षानंतरही हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहतात. या सुपरहिट चित्रपटानंतर बिग बींच्या करिअरची गाडी पुन्हा एकदा रुळावर परतली. त्यामुळे ‘मोहब्बतें’ या चित्रपटानं अमिताभ बच्चन यांच्या करिअरमध्ये संजीवनी बुटीचं काम केलं असं अनेकदा म्हटलं जातं.