गेला आठवडाभर शेतकरी आंदोलनाबाबत समाजमाध्यमांवरून कलाकारांच्या प्रतिक्रियांचा एकच हलकल्लोळ सुरू आहे. एकतर कलाकार सहसा कु ठल्याही गोष्टीवर ठाम भूमिका घेत नाहीत आणि एखाद्याने तशी भूमिका घेतलीच तर दुसरा त्याची भूमिका खोडून टाकण्यातच अधिक रमतो. मात्र अळीमिळी गुपचिळी असलेले कलाकार अचानक कधीतरी एकाच सुरात बोलू लागतात आणि वेगळेच नाट्य रंगू लागते…

देशभरात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. या काळात आंदोलन अधिकाधिक आक्रमक होत गेले, मात्र सुरुवातीपासून या आंदोलनाबद्दल नेहमीचे काही ठरावीक कलाकार वगळता अन्य कलाकारांनी भूमिका घेणे टाळले होते. पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसैनने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला. त्याने स्वत: आंदोलनातील शेतकऱ्यांची भेटही घेतली, मात्र याच आंदोलनात सहभागी झालेल्या एका पंजाबी महिलेला शाहीन बाग प्रकरणातील ‘बिल्कीस बानो’ समजत त्यांच्यावर आरोपांचा भडिमार कंगनाने केला. याप्रकरणी कं गनाला समाजमाध्यमांवरूनच दिलजीतने चार शब्द सुनावले. त्यानंतर या आंदोलनातील घटना आणि दिलजीत दोसैन या दोन्ही गोष्टींत बारकाईने ‘लक्ष’ घालून कंगनाने समाजमाध्यमांवरून हा वाद पेटता ठेवला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिलजीतनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, प्रीती झिंटा, सोनम कपूर, तापसी पन्नू, सोनू सूद, रितेश देशमुख, दिग्दर्शक हंसल मेहता अशा बॉलीवूडमधील कलाकारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सातत्याने आपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी या कलाकारांनाही वैयक्तिकरीत्या काही ट्रोलना सामोरे जावे लागले, मात्र या सगळ्याचा कु ठल्याही प्रकारे बोभाटा झाला नव्हता. त्याचे कारण म्हणजे यातील बहुतांश मंडळी ही कायम समाजमाध्यमांवरून व्यक्त होत आली आहेत. वैयक्तिक असो वा देश-परदेशात घडलेल्या घटना असोत… यांच्यापैकी प्रत्येक कलाकार कायम व्यक्त होत राहिला आहे. मात्र बॉलीवूडची आघाडीची फळी म्हणून ज्या कलाकारांची गणना होते ते या आंदोलनाबाबत आजपावेतो शांत होते. मग अचानक त्यांना कं ठ फु टला आणि सगळेच एकापाठोपाठ एक व्यक्त झाले…

बॉलीवूडमधील दुफळी

तब्बल दोन महिन्यांनंतर रिहाना या अमेरिकी गायिके ने ‘सीएनएन’ वाहिनीवरील बातमीचा दाखला देत आपण याबद्दल का बोलत नाही, असा प्रश्न समाजमाध्यमांवरून के ला. सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आणि एकच गोंधळ उडाला. या दोघींच्या ट्वीटची दखल घेत देशाच्या परराष्ट्र खात्याने देशाचे सार्वभौमत्व बिघडवणाऱ्या या परदेशी लोकांना तथाकथित समज दिली आणि मग हेच ट्वीटचे लोण अक्षय कु मार, करण जोहर, अजय देवगण यांच्यापासून ते सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरले. हा गोंधळ इथेच थांबला नाही, तर नेहमीप्रमाणे बॉलीवूडमधील दुफळी इथेही दिसून आली. एकीकडे रिहाना आणि ग्रेटाने घेतलेल्या भूमिके बद्दल बॉलीवूडमधील एका कलाकारांच्या गटाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, तर दुसरीकडे ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा’ या हॅशटॅग अंतर्गत परदेशी लोकांनी आमच्या देशाची एकता बिघडवू नये, अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली आहे.

मीच राणी…!

या गोंधळाचा सर्वाधिक फायदा नेहमीप्रमाणे कं गना राणावतने घेतला आहे. दिलजीतला स्थानिक क्रांतिकारी म्हणून हिणवण्यापासून ते शेतकरी आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीला प्रियांका आणि दिलजीतसारखी मंडळीच कशी जबाबदार आहेत वगैरे वगैरे वाद कं गनाने उकरून काढले. जो जो या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेईल, त्याचा समाजमाध्यमांवरून जाहीर उद्धार करणे हे एकच काम कं गनाने गेल्या काही दिवसांत मनापासून के ले आहे. रोहित शर्माविरोधात कं गनाने के लेले ट्वीटही ट्विटरने काढून घेतले, मात्र तरीही मीच कशी शहाणी हे दाखवून देण्याचा कं गनाचा प्रयत्न अजूनही थांबलेला नाही. रिहानाला ‘मूर्ख’, तापसी पन्नूला ‘देशावरचं ओझं’ अशा उपमा देत तिचं टीकास्त्र अजूनही सुरूच आहे. इतकं च नाही तर मूर्खांच्या या जगात मीच शहाणी आहे, असं सांगत टीकाकारांना आपल्यासमोर झुकण्याचं आवाहन करूनही ती मोकळी झाली आहे.

 दिग्दर्शक  समीर विद्वांस यांचेही ट्वीट

शेतकरी आंदोलनावरून माजी क्रिके टपटू सचिन तेंडुलकर यांनी घेतलेली भूमिका न पटल्याने दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त के ली. एवढेच नाही तर भारताबाहेरच्या लोकांनी आपल्या अंगर्तत मामल्यात बोलायची गरज नाही हे तुमचं मत ठीक आहे. तुम्हाला सरकारची बाजू पटते आहे ओके … तरीही आपल्याच शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रुधूर, लाठ्या, बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? ‘भारत समर्थ आहे’ असा? अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त के ल्या आहेत. यावरून लोकांनी अर्वाच्य भाषेत ट्रोल के ले असले तरी मी सभ्य भाषेत आपली मतं मांडत राहणार, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.