News Flash

‘विकास दुबे एन्काऊंटर’ आता मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

पाहा ट्रेलर...

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला. या गुंडाच्या आयुष्यावर आधारित आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटाचे नाव “बिकरू कानपुर गँगस्टर” असे असून चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

“बिकरू कानपुर गँगस्टर” हा चित्रपट विकास दुबेच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकास दुबे ही भूमिका अभिनेता निमय बालीने साकारली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या २ मिनिटे ६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये विकास दुबेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. विकास दुबेने केलेले गुन्हे, त्याच्यावर सुरु असलेले खटले, उत्तर प्रदेशात त्याने निर्माण केलेली दहशत हे सर्व चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

“बिकरू कानपुर गँगस्टर” या चित्रपटाची निर्मिती अजय पाल सिंह आणि सी पी सिंह यांनी केली आहे. विकास दुबे हे पात्र साकारणारे निमय बाली यांनी यापूर्वी “जय हनुमान”, “भाभी”, “कुमकुम”, “डोली साजा के रखना ”,“ अंबर धारा ”,“वो रेहने वाली मेहलोन की’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

विकास दुबे उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड होता. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १० जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांचे एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. दरम्यान संधी साधून पोलिसांवर हल्ला करत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केले. आता विकास दुबेच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 1:26 pm

Web Title: movie on gangster vikas dubey encounte bikru kanpur gangster trailer avb 95
Next Stories
1 ‘मॅडम माफ करा’, कविता कौशिकने स्क्रीनशॉट शेअर करताच ट्रोल करणाऱ्याने मागितली माफी
2 डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांची नवी कविता
3 कपिल शर्माची ‘चिमुकली रॉकस्टार’, अनायराचा गोड डान्स व्हायरल
Just Now!
X