पुणे येथे नुकत्याच झालेल्या ‘मिसेस महाराष्ट्र’च्या चौथ्या पर्वात येथील राधिका निशील जहागीरदार यांना ‘मिसेस महाराष्ट्र’चा मुकूट प्रदान करण्यात आला.

‘दिवा पेजेन्ट्स’ ही स्पर्धा सौंदर्यवतींसाठी मानाची मानली जाते. या स्पध्रेत सहभागी झालेल्या सौंदर्यवतींना मार्गदर्शन देण्याचे ‘दिवा पेजेन्ट्स’चे संचालक अंजना मस्करहान्स आणि कार्ल्स यांनी केले. परीक्षक म्हणून अभिनेत्री झोया अफरोज, वर्षां ऊसगांवकर, अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी काम पाहिले. या स्पध्रेत एकूण ५० सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बौद्धिक स्पर्धा, स्व:परीचय, आकर्षक देहबोली, प्रश्नोत्तर स्पर्धा अशा विविध पातळयांवर राधिका जहागीरदार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

राधिका जहागीरदार या ओम कॉलनीतील रहिवासी सतीश ढोक व चित्रा ढोक यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण गोल्डन किड्स हायस्कूल आणि विद्याभारती महाविद्यालय येथे झाले. अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण त्यांनी पुणे येथे घेतले. सध्या त्या पुणे येथील कमिन्स टेक्नॉलॉजी सेंटर येथे कार्यरत आहेत.त्यांचे पती निशीज जहागीरदार हे सॉफटवेअर अभियंता आहेत. राधिका यांना आठ वर्षीय ईवा ही मुलगी आहे. सौदर्यस्पध्रेनंतर राधिकाने सर्व युवतींना आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा संदेश दिला. राधिका यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

((( राधिका जहागीरदार यांना ‘मिसेस महाराष्ट्र’चा मुकूट प्रदान करताना अभिनेत्री झोया अफरोज