१३ फेब्रुवारीला पूर्ण होणार अस्सं सासर सुरेख बाईचे ५०० भाग

नात्यात प्रेम आणि विश्वास असला की कुठेही नंदनवन फुलवता येतं, या श्रद्धेने सुरु झालेली यश-जुईची प्रेमकहाणी येत्या १३ फेब्रुवारीला ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे. रसिक प्रेक्षकांनी यश-जुईला भरभरून प्रेम दिलं, प्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच आज अस्सं सासर सुरेख बाई मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. येत्या १३ फेब्रुवारीला मालिकेचे ५०० भाग पूर्ण होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाळीतल्या या दहा बाय दहाच्या घराने गेल्या ५०० भागांत अनेक चढउतार पाहिले. यश-जुईची फुलणारी प्रीती पाहिली, घर आणि करिअर सांभाळतानाची तारेवरची कसरत पाहिली, गैरसमजातून झालेली भांडणं देखील पाहिली, पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती म्हणजे, कोणत्याही संकटाच्या वेळी जीवाला जीव देणारी, आपुलकी जपणारी सुरेख सासरची सुरेख माणसं ! आपल्याच घरची, आपल्याच माणसांची वाटणारी, नात्यांमधली आपुलकी जपणारी ही प्रसिद्ध मालिका आता ५०० भागांचा टप्पा पूर्ण करत आहे आणि यानंतर ही कहाणी अधिकच उत्कंठावर्धक वळणावर पोचणार आहे… काय आहे हे नवं वळण, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अस्सं सासर सुरेख बाई ही मालिका पाहावी लागेल.