लग्न म्हटलं तर गाणं आणि संगीत आलंच….घरात वाजणारी गाणी आणि संगीत यावरुनच हे लग्नघर आहे हे लक्षात येत. छोटी पार्टी असो किंवा लग्नासारखा मोठा सोहळा…गाणी नसतील तर कार्यक्रमात मजा येत नाही. पण म्यूझिक कंपनी टी सीरिजने असा निर्णय घेतला आहे जो लग्नानंतर तुम्हाला महागात पडू शकतो. लग्नाची आठवण जपून ठेवण्यासाठी तयार कऱण्यात आलेल्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरणं तुम्हाला अडचणीत टाकू शकतं. टी सीरिजने लग्नाच्या व्हिडीओत वापरण्यात येणारी गाणी कॉपीराइटचं उल्लंघन असल्याचा दावा करत अनेकांना नोटीस पाठवली आहे. तसंच 100 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, टी सीरिजने आपली गाणी व्हिडीओ अल्बममध्ये वापरल्याप्रकऱणी पंजाब, हरियाणा, झारखंड आणि गुजरातसहित अनेक राज्यांमधील 100 हून अधिकार फोटोग्राफर्सना नोटीस पाठवली आहे. या सर्वांवर कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. इतकंच नाही तर कंपनीने गेल्या दोन महिन्यात फक्त हरियाणामधील 30 दुकानदारांना नोटीस पाठवली आहे. गाणी वापरायची असल्यास परवाना घ्यावा लागेल असं कंपनीचं म्हणणं आहे.

टी सीरिजने केलेल्या कारवाईवर 50 हजार फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. परवाना घेणं सोपं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परवाना जरी घेतला तरी व्यवसायावर फरक पडेल. दर वाढवावे लागतील असंही ते म्हणाले आहेत. असोसिएशन आणि टी सीरिजमध्ये चर्चा सुरु असून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे लग्नाचे व्हिडीओ तयार कऱणाऱ्या दुकानदारांनी प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आपला अल्बम सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार नाही तसंच व्यवसायिक वापर केला जाणार नाही असं लिहिण्यात आलं आहे.

याप्रकरणी टी सीरिजचे अँटी पायरसी मॅनेजर विपीन कुमार यांचं म्हणणं आहे की, कंपनीने देशभरातील 100 दुकानदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व विना परवाना गाणी वापरत होते. आपल्या व्यवसायासाठी गाण्यांचा वापर करायचा असेल तर परवाना घेणं अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music compnay t series sends notice to photographers using songs
First published on: 16-11-2018 at 14:55 IST