मी कॉलेजमध्ये असताना मला या दिवसाचं भरपूर आकर्षण होत. व्हॅलेन्टाईन डे ला कोणीतरी येत, आपल्याला गुलाब देऊन प्रपोज करत, असे काहीसे फिल्मी विचार माझ्या मनात यायचे. पण कॉलेज लाईफ नंतर ते सगळ बदलल. प्रेमासाठी सगळे दिवस समान असतात.  मात्र, परस्परांमध्ये प्रेम असूनदेखील ते व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळत नाही. नवरा-बायकोमध्ये प्रेम हे असतंच, पण दोघांना ते व्यक्त करता यावं म्हणून असा हा खास दिवस असतो.  आपल्या अबोल भावनांना बोलते करण्यासाठी आणि नवरा बायकोचे नाते अजून घट्ट करण्यासाठी वॅलेन्टाईन डे गरजेचा आहे. माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न आहे, माझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणणारा प्रिन्स चार्म मला हवा आहे. आणि हे सगळ वास्तवात घडणे शक्य नाही. त्यामुळे मी त्याला स्वप्नातच पाहणे पसंत करते. माझा ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा सिनेमा देखील प्रेमावर आधारित आहे. माझ्या प्रेक्षकांना तो नक्की आवडेल अशी मी आशा करते.