‘रामायण’, ‘महाभारत’, या दोन महाकाव्यांचं गारुड आजही आपल्या मनावरुन उतरलेले नाही. या कथानकांवर तयार होणारी पुस्तकं, चित्रपट, मालिका एवढंच काय तर कार्टून सीरिजदेखील प्रचंड लोकप्रिय होतात. पौराणिक संदर्भ असलेल्या अनेक गोष्टी अगदी आजीच्या पोतडीतल्या असतील तरीही आपलं मनोरंजन करतात. आपल्याला कायम ज्याविषयी आकर्षण वाटत आलंय अशा या कथांचा जन्म कसा झाला? रामायण, महाभारत हे आजच्या काळात आपल्याला काय शिकवतं याच्याकडे आधुनिक पद्धतीने पाहण्याचा दृष्टीकोन देणाऱ्या माणसाचं नाव आहे देवदत्त पटनायक. देवदत्त पटनायक यांनी देवाकडे, पुराणाकडे, संस्कृतीकडे एक आधुनिक दृष्टीकोन दिला आहे. आपल्याला आपल्या देवांविषयी, पुराणकथांविषयी, प्राचीन संस्कृतीविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देवदत्त पटनायक देणार आहेत.

७ जून रविवारी सकाळी ११ वाजता लोकसत्ता डिजिटल अड्डा या कार्यक्रमात यावेळी देवदत्त पटनायक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या मुलाखतीत प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार आहे. तुम्हाला पुराण कथांसंबंधीत आजवर पडलेले सर्व प्रश्न तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर विचारु शकता. Loksattalive या फेसबुक पेजवर ही मुलाखत तुम्हाला पाहता येईल. न विसरता रविवारी सकाळी ११ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचेही प्रश्न तयार ठेवा.

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.