News Flash

Birthday Special: नम्रता शिरोडकरने ‘या’ कारणासाठी सोडले होते फिल्मी करिअर

जाणून घ्या कारण...

अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा आज २२ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. तिने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केले. महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. एका मुलाखतीमध्ये नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण सांगितले होते.

नम्रताने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आणि महेश बाबूच्या नात्याविषयीच्या अनेक गोष्टींवर वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने सांगितले की महेशला वर्किंग वुमेनशी लग्न करायचे नव्हते. ‘महेशने एक गोष्ट ठरवली होती की त्याला वर्किंग वुमनशी लग्न करायचे नव्हते’ असे नम्रता म्हणाली. त्यामुळे लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.

फोटो: सुपरस्टार महेश बाबूकडे आहे ६ कोटींची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

२०१८मध्ये नम्रताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की मी चित्रपटसृष्टी सोडल्यामुळे मला दु:ख झाले नाही. मी इतर अभिनेत्रींप्रमाणे विचार करत नव्हते. पण मी माझे काम तितक्याच आत्मविश्वासाने आणि आनंदाने केले होते. मी कधीही कोणाकडे काम मागितले नाही किंवा पैसे मागितले नाहीत. मला ऑफर आल्या आणि मी ते काम करत गेले.

महेश बाबू आणि नम्रताने १० फेब्रुवारी २००५ साली लग्न केले. त्यापूर्वी त्या दोघांनी चार वर्षे एकमेकांना डेट केले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांवर वक्तव्य केले नव्हते. त्यांनी त्यांचे नाते गुपित ठेवले होते. ‘महेशला नियम पाळायला आवडातात. चार वर्षे आम्ही एकमेकांना डेट कर होतो पण आमचे नाते त्याला सर्वांन समोर आणायचे नव्हते. महेशला करिअरमध्ये स्टेबल व्हायचे होते. पण त्याच्यासाठी कामापेक्षाही कुटुंब जास्त महत्त्वाचे होते’ असे नम्रता म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 11:14 am

Web Title: namrata shirodkar birthday special mahesh babu marriage love life avb 95
Next Stories
1 म्हणून प्रियांका अमेरिकेतून पळून आली होती भारतात
2 ‘बंगबंधू’ चरित्रपटाच्या चित्रिकरणाला मुंबईत सुरुवात
3 करिना व सैफमध्ये भांडण झाल्यावर कोण मागतं माफी? जाणून घ्या
Just Now!
X