News Flash

प्राथमिक सुविधांसाठी मोर्चे काढावे लागणे हे आपले अपयश – नाना पाटेकर

अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींना सुनावले.

आजकाल वेगवेगळे मोच्रे निघताहेत. पण असे वेगळे मोच्रे काढण्यापेक्षा आपण सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन मोच्रे काढले पाहिजेत. सामान्य माणसाला प्राथमिक सुविधांसाठी मोच्रे काढावे लागत असतील, तर हे आपलं अपयश आहे. अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींना सुनावले.

रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या रोहा मित्र पुरस्काराचे वितरण नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. रोह्य़ाच्या डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहात पार पडलेल्या समारंभात बोलताना नाना यांनी आपल्या खुमासदार

शैलीत सर्वाना हसवतानाच राज्यातील विद्यमान परिस्थितीवर कठोर शब्दांत भाष्य केले. मुस्लीम समाज शिकून मुख्य प्रवाहात आला पाहिजे. ते आपलेच बांधव आहेत. कुठल्याही व्यक्तीतला मी अमुक जातीचा म्हणून मोर्चा काढण्याची वेळ येता कामा नये. असेही ते म्हणाले. त्याच वेळी आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. आपल्या लायकीप्रमाणेच आपल्याला राजकारणी मिळणार, जशी प्रजा तसा राजा. आपण राज्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे. तसे जाब विचारत नाही. त्यामुळे त्यांचं फावतं, कुणी विचारणार नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात, असे खडे बोलही सामान्यांना सुनावले.

रस्त्यासारखी सुविधा देखील धड मिळत नाही. खड्डय़ांत पडून जीव जायला वेळ लागणार नाही. कोण जबाबदार याला. मग हे रस्ते का चांगले मिळत नाहीत. ते ५ वष्रे का टिकत नाहीत. त्यातत काय अडचणी आहेत. असे प्रश्न आपण राज्यकर्त्यांना विचारले तर ते काम करतील. अन्यथा ते दुर्लक्षच करतील, असेही नाना म्हणाले.

मुंबईत मला जावंसं वाटत नाही. तिथं जीव गुदमरतो म्हणून मी पुण्याला राहतो. कामासाठी नाईलाजास्तव मुंबईत यावं लागतं. अशा शब्दांत त्यांनी मुंबईबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या भाषणात नाना पाटेकर यांनी मुरूडमधील आपल्या बालपणीच्या आणि अगदी अलीकडच्या काळातील आठवणी सादर करीत उपस्थितांची दाद मिळवली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, रोह्य़ाचे नगराध्यक्ष समीर शेडगे, राष्ट्रवादीच्या युवती संघटक आदिती तटकरे, अनिकेत तटकरे आदींसह रोहेकर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:31 am

Web Title: nana patekar comment on basic facilities
Next Stories
1 फ्लॅशबॅक : लोकप्रिय चेहरे पहिल्यांदा एकत्र आणणारा ‘वक्त’
2 शर्मिला टागोर यांना ‘त्यांनी’ भेट दिले चक्क सात फ्रिज
3 टॉम क्रूझने नऊ मिनिटांत दाखवले त्याचे फिल्मी करिअर
Just Now!
X