अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांची अभिनेते नाना पाटेकर यांनी आज भेट घेतली. पाटण्यात सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला नाना पाटेकर भेट देण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर त्यांनी सुशांतच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सात्वंन केलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूवरून वेगवेगळे आरोपही करण्यात आले. सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर आज अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नाना पाटेकर हे पाटण्यात एका कार्यक्रमानिमित्त गेलेले होते.
सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला त्यांनी भेट दिली. त्यानंतर जवानांशी संवादही साधला. त्यानंतर नाना पाटेकर सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांचं सात्वंन केलं. विविध हिंदी माध्यमांशी या भेटीचं वृत्त दिलं असून, काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
After meeting the CRPF jawans. ACTOR Nana Patekar visit the Sushant Singh Rajput Home Rajeev Nagar In Patna…#CBIEnquiryForSSR #NanaPatekar#DilBecharaOnBigScreen pic.twitter.com/gx7XLGiDGv
— Sam (@O07SAM) June 28, 2020
कुटुंबीयांशी बोलताना नाना पाटेकर भावूक झाले. सुशांतच्या कुटुंबीयांचं सात्वंन करताना पाटेकर म्हणाले, “सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी व उत्तम अभिनेता होता. हा धीर व संयमाचा काळा आहे. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल,” अशा शब्दात नाना पाटेकर यांनी सुशांतचे वडिलांना धीर दिला.