पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) दूरचित्रवाणी दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी रमण दुम्पला याने दिग्दर्शित केलेल्या ‘ग्लो वॉर्म इन जंगल’ या माहितीपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार जाहीर झाला. विशेष म्हणजे ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि लेखिका प्रा. डॉ. हेमा साने यांच्या निसर्गपूरक जीवनशैलीचे चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे.

डॉ. साने गरवारे महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळच्या वाडय़ात त्या राहतात. मात्र, वीज आणि कोणतेही अत्याधुनिक उपकरण त्या वापरत नाही. आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाने युक्त जगात निसर्गपूरक जीवनशैलीला प्राधान्य देणाऱ्या डॉ. साने यांच्या दिनक्रमाचे चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. मूळचा हैद्राबादच्या असलेल्या रमण दुम्पलाने डॉ. साने यांच्या जीवनशैलीचे महत्त्व ओळखून त्यांच्यावर माहितीपट केला. हा माहितीपट जगभरातील अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेला असून आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची मोहोरही या माहितीपटावर उमटली आहे. हा विशेष पुरस्कार विद्यार्थी दिग्दर्शकासाठी देण्यात आला.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

‘राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाल्याचे कळल्यानंतर काही क्षण विश्वासच बसला नाही. म्हणून चार-पाच वेळा यादी तपासून पाहिली. अनेकदा या माहितीपटाच्या पुरस्कारांना विशेष महत्त्व दिले जात नाही. पण डॉ. साने यांच्या जीवनशैलीचे वेगळेपण आणि महत्त्व लक्षात घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला असावा. त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय डॉ. साने यांच्या जीवनशैलीला, विचारांना आहे. एवढय़ा वर्षांत पुण्यातील चित्रकर्मीनी साने यांच्यावर माहितीपट का केला नाही याचे आश्चर्यही वाटते. मात्र, माझ्या माहितीपटाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद वाटतो,’ अशी भावना रमणने व्यक्त केली.

एफटीआयआयच्याच नीरज सिंग या विद्यार्थ्यांला एकांत या लघुपटाच्या कलादिग्र्दनासाठी  पुरस्कार जाहीर झाला आहे.

युवा संगीतकार केदार दिवेकरला संगीत दिग्दर्शनासाठी पुरस्कार

‘ज्योती’ या लघुपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी पुण्यातील युवा संगीतकार केदार दिवेकरला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. एका मुलीच्या शिक्षणावर आधारित असलेल्या ‘ज्योती’ या लघुपटाचे दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले आहे. ‘राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होणे हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कारण संगीतकार म्हणून दहा-बारा वर्षे काम करत असताना एवढय़ा लवकर इतका मोठा पुरस्कार मिळण्याची कल्पनाही केली नव्हती. या पुरस्काराच्या रुपाने आजवर केलेल्या कामाला प्रशस्ती मिळाल्याचे वाटते. योगायोग म्हणजे मला पहिल्यांदा चित्रपटाचे संगीत देण्याची संधी योगेश सोमण यांनीच दिली होती. आता त्यांच्याच लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे,’ अशा शब्दांत केदारने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.