अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांच्या भन्नाट अभिनयाने सजलेल्या ‘जॉली एलएलबी’ या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. मराठीमध्ये हा मान प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाने पटकावला.
६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा राजधानी नवी दिल्लीमध्ये करण्यात आली. मराठीमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष हिला ‘अस्तू’ चित्रपटातील अभिनयाबद्दल सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘यलो’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘फॅंड्री’तील भूमिकेसाठी बालकलाकार सोमनाथ अवघडे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – जॉली एलएलबी
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता – सौरभ शुक्ला (जॉली एलएलबी)
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट:
* आजचा दिवस माझा : सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
* यल्लो : स्पेशल ज्यूरी पुरस्कार
* गौरी गाडगीळ : स्पेशल ज्यूरी पुरस्कार (यल्लो)
* तुह्या धर्म कोंचा : सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट
* बेला शेंडे : सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन (तुह्या धर्म कोंचा)
* नागराज मंजुळे : पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (फँड्री)
* सोमनाथ अवघडे : सर्वोत्कृष्ट बालकलाकार (फँड्री)
* अमृता सुभाष : सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (अस्तु)
* सुमित्रा भावे : सर्वोत्कृष्ट संवाद (अस्तु)