25 January 2021

News Flash

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटर हँडलवर मौनीचे बोल्ड फोटो; नंतर मागितली माफी

वाचा काय आहे प्रकरण?

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या अभिनेत्री मौनी रॉयची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा असते. मौनी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, आता मौनी नाही तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मौनीचे फोटो शेअर केले गेले आहेत.

राष्ट्रीय शेअर बाजारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नेहमीच अर्थव्यवस्था, गुंतवणूक, बाजारपेठेतील ट्रेंड या संबंधीत पोस्ट असतात. तर यावेळी एनएसईने या संबंधीत नाही तर मौनी रॉयचे फोटो शेअर केले आहेत. मौनीचे हे फोटोपाहून तिचे चाहते हैराण झाले आणि त्यांनी एनएसईला ट्रोल केलं. हे पाहून एनएसईने त्यांची बाजू सावरत गैरसोयीबद्दल माफी मागितली. “आज एनएसई हँडलवरून रात्री १२:२५ वाजता चुकीची पोस्ट करण्यात आली. एनएसईचे ट्विटर हँडल सांभाळणाऱ्या एजन्सीने केलेली ही चूक होती आणि यात कोणतही हॅकिंग वगैरेचा प्रकार नव्हता. आमच्या फॉलोअर्सना झालेल्या गैरसोयीबद्ल आम्ही माफी मागतो”, असं ट्विट करत त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

एनएसईने जरी माफी मागितली असली तरी हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याचे स्क्रीनशॉट अनेक युजर्सकडून शेअर करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:22 pm

Web Title: national stock exchanges post mouni roy pics on twitter gets trolled dcp 98
Next Stories
1 ‘बिग बॉस’मध्ये पहिल्यांदाच सलमान झाला भावूक, पाहा व्हिडीओ
2 हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझानने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाली…
3 ‘सख्खे शेजारी’ या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X