20 January 2021

News Flash

#MeToo: माजी मिस इंडिया निहारिका सिंगचे नवाजुद्दीनवर आरोप

निहारिकाने नवाजसोबतच दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माते भूषण कुमार यांच्यावरही आरोप केले आहेत.

निहारिका सिंग, नवाजुद्दीन सिद्दीक

‘#MeToo’ मोहिमेअंतर्गत आता बॉलिवूडमधील आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री निहारिका सिंगने नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप केले आहेत. निहारिकाने एक भलीमोठी पोस्टच लिहिली असून पत्रकार संध्या मेनन यांनी ते ट्विट केलं आहे. निहारिकाने नवाजसोबतच दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माते भूषण कुमार यांच्यावरही आरोप केले आहेत.

‘मिस लव्हली’ या चित्रपटात निहारिकाने नवाजसोबत काम केलं. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. ‘एके दिवशी माझ्या घराजवळच नवाजुद्दीनच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. हे शूटिंग रात्रभर सुरू होतं. म्हणून मी नवाजला सकाळी माझ्या घरी नाश्त्यासाठी बोलावलं. तो सकाळी घरी आला आणि मी दरवाजा उघडताच त्याने मला मिठीत घट्ट पकडलं. त्याला धक्का देण्याचा मी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. धडपडीनंतर मी कसेबसे त्याच्या मिठीतून सुटले,’ असं निहारिकाने लिहिलं आहे.

”मिस लव्हली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीनसोबत चांगली मैत्री झाली पण नवाजचं अनेक मुलींसोबत अफेअर होतं हे मला नंतर कळालं. मुलींना खोट्या कहाण्या सांगून तो फसवतो. त्याचं हे रुप जेव्हा माझ्यासमोर आलं तेव्हा मी त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले,’ असं तिने सांगितलं. निहारिकाने २००५ साली ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तेव्हा ‘अ न्यू लव्ह इश्टोरी’ या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी निर्माते भूषण कुमार यांनी त्यांच्या ऑफीसमध्ये बोलावल्याचं तिने सांगितलं. ऑफीसमध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी डेटवर जाऊ असा मेसेज केल्याचा आरोप निहारिकाने केला आहे.

गेल्या वर्षी नवाजुद्दीनचं आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं होतं. या आत्मचरित्रात त्याने निहारिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं लिहिलं होतं. निहारिकाची परवानगी न घेता आत्मचरित्रात उल्लेख केल्याने नवाजला अखेरीस त्याचं प्रकाशन थांबवावं लागलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 2:21 pm

Web Title: nawazuddin siddiqui is sexually regressive toxic man says former miss india niharika singh metoo
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’मधील त्या पात्रावर आगरी समाजाचा आक्षेप
2 शाहरुखच्या ‘झीरो’ चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका
3 ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चे पैसे वसूल करून देण्यासाठी ‘वहाण’ची भन्नाट ऑफर
Just Now!
X