अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे, त्याची पत्नी आलिया सिद्दिकीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांविरोधात आलियाने मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने घटस्फोट घेण्यामागचं कारण सांगितलं. नवाजुद्दीनने तिला कधीच पत्नीची वागणूक दिली नाही, असा आरोप तिने केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितलं, “नवाजुद्दीन कधीच त्याच्या मुलांना भेटत नाही. बाबा कुठे आहेत, कुठे शूट करत आहेत, असा प्रश्न मुलं विचारतात. बाबा परदेशी शूट गेले आहेत असं खोटं कारण मी त्यांना देते. मुंबई ऑफिसला असतानाही नवाजुद्दीन कधीच येऊन मुलांची भेट घेत नाही.” आलियाने दोन्ही मुलांचा ताबा तिला मिळावा अशी मागणी केली आहे.

Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

एका घटनेबद्दल ती पुढे म्हणाली, “घरी बरेच सेलिब्रिटी यायचे. त्यांच्यासमोर नवाजुद्दीनने माझा अपमान केला आहे. अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यासमोर त्याने माझा अपमान केला. तुला नीट बोलता येत नाही, तू लोकांसमोर बोलत जाऊ नकोस, अशा शब्दांत त्याने मला सुनावलं होतं. इतरांसमोर नेहमी त्याने मला दुर्लक्ष केलं. पत्नी म्हणून कधीच त्याने मला सन्मानाने वागणूक दिली नाही. इतकी वर्षे मी हा सगळा अपमान सहन केला.”

आलियाने ईमेल व व्हॉट्स अॅपद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीन उत्तर प्रदेशमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत आहे. तिथे त्याला व त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याने अद्याप घटस्फोटाच्या नोटीशीला उत्तर दिलेलं नाही.