सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.

ही मालिका लवकरच लीप घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा दैदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.

आणखी वाचा : “रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो”; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पंकजांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.