News Flash

ऋषी-रणबीरचा ‘प्रेम ग्रंथ’

'बेशरम' या चित्रपटात रणबीर आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केले होते.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कलाकार आणि त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रसिद्धी, यशाचा नेहमीच अनेकांना हेवा वाटतो. चित्रपटसृष्टीत आणि एकंदर चाहत्यांमध्येही अशाच एका कुटुंबाचा सर्वांनाच हेवा वाटतो आणि ते कुटुंब म्हणजे कपूर घराणे. बॉलिवूडमध्ये गेली कित्येक वर्षे योगदान देणाऱ्या या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या या कुटुंबातील अभिनेता रणबीर कपूर, करिना कपूर अनेकांचीच मने जिंकत आहेत. चाहत्यांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या साँवरिया रणबीरचा असाच एक फोटो रणबीरच्या आईने म्हणजेच नीतू कपूरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हा फोटो पाहताच रणबीर आणि चित्रपटसृष्टीचे नाते फार आधीपासूनच आहे हेच स्पष्ट होत आहे. रणबीर या फोटोमध्ये एक क्लॅपबोर्ड पकडून उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोतून रणबीर आणि पापा ऋषी कपूर यांच्यातील मित्रत्वाचे नातेही पाहायला मिळत आहे. रणबीरच्या हातात असलेला क्लॅपबोर्ड हा ऋषी कपूर यांच्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचा असून त्यावर ‘सीन नं. ५२, शॉट नं. ८ आणि टेक नं. १’ असे लिहिले असून २८ मे १९९४ या दिवशीचा हा फोटो आहे. नीतू कपूर यांनी या फोटोसह एक सुरेखसे कॅप्शनही लिहिले आहे.

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी बापलेकांच्या जोड्यांच्या यादीमध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि ऋषी कपूर यांच्या नावाचाही समावेश आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेशरम’ या चित्रपटात रणबीर आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केले होते. दरम्यान २०१६ हे वर्ष रणबीर कपूरच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने प्रेक्षकांची दाद मिळवली होती.

रणबीर लवकरच ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिरा असणाऱ्या या चित्रपटाने दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले असून त्यांच्यासोबत रणबीरचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने अनुरागच्या ‘बर्फी’ या चित्रपटामध्ये काम केले होते. ‘जग्गा जासूस’ नंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अनुराग बासू प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जीवनावर बनणाऱ्या एका चित्रपटासाठीदेखील एकत्र काम करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 6:24 pm

Web Title: neetu kapoor shared throwback pic of ranbir and dad rishi kapoor
Next Stories
1 ओम पुरींच्या आठवणींनी नसिरुद्दीन शाह गहिवरले
2 मी एक कलाकार आहे, नेता नाही- शाहरुख खान
3 चिमुकल्या अरहानसोबतचा जुना फोटो मलायकाने केला शेअर
Just Now!
X