बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या पिता-पुत्रांच्या जोडीमध्ये आवर्जुन नाव घेतलं जातं ते म्हणजे अभिनेता ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांचं. या दोघांचंही नातं वडील-मुलापेक्षा जास्त मित्रत्वाचं आहे. त्यामुळे अनेक वेळा ही जोडी चर्चेत येत असते. ऋषी कपूर सध्या न्युयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असून त्याचे उपचार शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ते लवकरच मायदेशी परतण्याची शक्यता आहे. सध्या न्युयॉर्कमध्ये नीतू कपूर ऋषी यांच्यासोबत असून अनेक रणबीरही तेथे हजर असतो. रणबीरकडे पाहिल्यानंतर तो बऱ्याच वेळा आपल्या वडिलांना फॉलो करताना दिसतो. त्यामुळेच त्याने पुन्हा एकदा असंच काहीसं केलं आहे. रणबीरने ऋषी कपूर यांचं एका लोकप्रिय गाणं पुन्हा एकदा त्यांच्याच अंदाजामध्ये सादर केलं आहे. विशेष म्हणजे रणबीरचा हा व्हिडीओ नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर रणबीर आणि ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर ऋषी कपूर यांच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘तेरे मेरे होठों पे…’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. इतकंच नाही तर रणबीरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा दिसून येत आहे.
चांदणी या चित्रपटातील ‘तेरे मेरे होठों पे.. ‘हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. हे गाणं ऋषी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. हे गाणं त्याकाळी तुफान लोकप्रिय झालं होतं. त्याच गाण्यावर थिरकण्याचा प्रयत्न रणबीर आणि अनुष्काने केला असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

This is so adorable