News Flash

‘ती पुढे निघून गेली आणि मी…’, नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडचा खुलासा

हिमांशने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा २०१८मध्ये अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाला. एका रिअॅलिटी शोमध्ये नेहाने हा खुलासा केला होता. त्यावेळी नेहा आणि हिमांश हे प्रचंड चर्चेत होते. पण हिमांशने यावर प्रतिक्रिया दिला नव्हती. पण आता नेहाचे रोहनप्रीत सिंहशी लग्न झाल्यानंतर हिमांशने त्यांच्या ब्रेकअपवर वक्तव्य केले आहे.

नुकतीच हिमांशने ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. ‘तो माझा ब्रेकअप होता. मला जगाला सांगण्याची काही गरज नाही की माझ्या घरात काय घडलं? यामुळे का दुसऱ्यांना त्रास द्यायचा? तुम्हाला का या प्रकरणात इतका रस आहे?’ असे हिमांश म्हणाला.

PHOTOS: नागार्जुनची सून अभिनेत्री समांथा अक्किनेनीचे क्लासिक घर, पाहा आतून कसे दिसते

 

View this post on Instagram

 

A post shared by Himansh Kohli (@kohlihimansh)

आणखी वाचा : वडील मोहन गोखलेंच्या आठवणीत सखी झाली भावूक

पुढे तो म्हणाला ‘२०१८मध्ये हे सर्व घडलं होतं. मी यासाठी नेहाला दोष देत नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. ती देखील आनंदी आहे. मी स्वत:साठी देखील आनंदी आहे. मी आपल्या स्वप्नातले आयुष्य जगत आहे. पैसे कमावत आहे. प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण काही लोक अजूनही २०१८मध्येच आहेत. ते त्यातून पुढे जातच नाहीत. आता आपण २०२१मध्ये आहोत. आपण त्याबद्दल काही करु शकत नाही. अनेकांना वाटते की माझ्यामुळे गोष्टी चुकीच्या घडल्या. पण मला माहिती आहे की मी वाईट व्यक्ती नाही.’

हिमांश पुढे म्हणाला की मी काही चुकीचे केले नाही आणि कोणाला त्या बद्दल सांगत बसाची गरज वाटत नाही. त्यावेळी आम्ही दोघेही रागात होतो. नेहाला जे करायचे होते ते तिने केले. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. मात्र मी पोस्ट केली नाही. मी कोणालाही दोष देत नाही. म्हणून मी कधीही यावर बोललो नाही असे हिमांश पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 11:32 am

Web Title: neha kakkar ex boyfriend himansh kohli talked about his breakup avb 95
Next Stories
1 ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध
2 ‘जर सगळ्या गोष्टी माहित आहेत तर सोनू सूदसारखी मदत का करत नाही?’, कंगनावर संतापली अभिनेत्री
3 “आधी तुझ्या भावाला सांग”; ‘त्या’ पोस्टनंतर करीना कपूर झाली ट्रोल
Just Now!
X