सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत अनेक ऐतिहासिक, राजकीय, पौराणिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आल्याचं दिसून आलं. त्याच आता आणखीन एक अशाच मुद्द्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव सध्या अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे.

८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी! असं आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाची दिग्दर्शन सुश्रुत भागवत करत आहे. तर निर्मिती उदाहरणार्थ या निर्मितीसंस्थेअंतर्गत होत आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा विकास हांडे, लोकेश मांगडे व सुधीर कोलते यांच्या खांद्यावर आहे. तर यातीर खुमासदार संवाद संजय मोने यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाविषयी किंवा त्याच्या पटकथेविषयी फारसा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. मात्र, यात दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजशिर्के, शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.