News Flash

माझा संकल्पः डायरीतील नमूद गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न

न्यू इअर रिजोल्यूशनपेक्षा प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं मी पसंत करते.

budget 2016, prarthana behere,
प्रार्थना बेहरे

गेली काही वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. माझ्या करियरमध्ये योग्य संधी आणि वेळ उत्तम जुळून आली. ज्यामुळे मी करत असलेल्या मेहनतीचं रुपांतर प्रगतीत होत गेलं. २०१५ वर्षात घडलेल्या घडामोडी त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळेच मी २०१६ ची आतुरतेने वाट पाहतेय. न्यू इअर रिजोल्यूशन मी करत नाही. त्यापेक्षा प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं मी पसंत करते. ज्यात येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १० गोष्टी मी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येत नेमकी मेहनत कुठे करायची आहे ते. माझ्या मते न्यू इअर रिजोल्यूशनचा उद्देश्य देखील हाच असतो. २०१५ माझ्यासाठी खूप यशस्वी गेले. कारण या वर्षीच्या ‘मितवा’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’  या सिनेमामुळे मला ख-या अर्थाने लोक ओळखू लागले. आगामी वर्षात येणाऱ्या ‘मिस्टर एंड मिसेस सदाचारी’ या सिनेमातील माझा अभिनय प्रेक्षकांना अजून आवडेल अशी मी आशा करते. माझा वाढदिवस वर्षाच्या सुरुवातीलाच (५ जानेवारी) येतो. त्यामुळे माझ्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात नेहमीच स्पेशल असते.
अभिनेत्री- प्रार्थना बेहरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 1:05 am

Web Title: new year resolution of actress prarthana behere
Next Stories
1 ‘KhanMarketOnline’ सलमानची चाहत्यांना भेट
2 आव्हान पेलताना..
3 सनीची लावणी, मराठी तारकांचे नृत्य
Just Now!
X