28 September 2020

News Flash

माझा संकल्प: चॅरिटी दवाखाना सुरु करणार

नवीन वर्ष माझ्यासाठी नेहमीच उत्साह आणि आनंद घेऊन येणारा असतो.

नवीन वर्ष माझ्यासाठी नेहमीच उत्साह आणि आनंद घेऊन येणारा असतो. येत्या वर्षात हाच उत्साह २०१६ मध्ये द्विगुणीत झाला आहे. प्रत्येक वर्ष माझ्यासाठी नवीन संकल्पनेचा असतो. माझे मन मला नेहमीच काहीतरी नवीन करायला प्रवृत्त करत असते आणि ती गोष्ट पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न देखील करते. येत्या वर्षात मी माझी म्युझिक अकॅडमी सुरु करण्याचा विचार करत आहे. तसेच चॅरिटी दवाखाना सुरु करणार आहे जेणेकरून माझा मेडिकलचा अभ्यास सुरु राहील. येत्या २०१६ मध्ये नेहा राजपाल प्रॉडक्शन निर्मित ‘फोटोकॉपी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाला घवघवीत यश मिळेल ही आशा करते. १ जानेवारीला माझ्या लग्नाचा वाढदिवस देखील असतो. दरवर्षी मी आणि आकाश दोघे कुठेतरी लांब जाण्याचा प्लॅन करतो पण यंदा फोटोकॉपीच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु असल्यामुळे या वर्षी आम्ही मुंबईत आहोत. या वर्षीचा डमल धमाका मी प्रेक्षकांसोबत अनुभवणार आहे.
गयिका – नेहा राजपाल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 1:06 am

Web Title: new year resolution of singer neha rajpal
Next Stories
1 काजल शर्मा व फैजल खानची ‘प्रेमकहाणी’
2 ललित व नेहा उलगडणार लघुपट कथेचा प्रवास
3 आझादसाठी आमिर बनला ‘नाताळ बाबा’!
Just Now!
X