छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. निया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता नुकताच नियाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निया बोल्ड अंदाजात दिसत आहे. नियासोबत तिची मैत्रिण रेहान पंडित आहे. नियाने या व्हिडीओत काळ्यारंगाचा बॅकलेस टॉप परिधान केला आहे. यात निया ग्लॅमरस दिसत आहे. नियाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘मी वाट पाहू शकत नाही’, अर्जुनने केला मलायकाचा व्हिडीओ शेअर
या आधी नियाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत निया आणि तिचे मित्र बचपन का प्यार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. निया तिच्या स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले होते. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.