‘निवडुंग’ या आगामी मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या संवेदनशील विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मीना शमीम फिल्म्स बॅनरतर्फे तयार करण्यात येत असलेल्या या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक मुनावर शमीम भगत आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा नुकताच शिर्डी आणि मुंबईत पार पडला.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रपटातील एका लावणी नृत्याचे चित्रीकरण झाले. अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही या लावणी नृत्यात सहभागी झाली होती. गीतकार झहीर कलाम यांनी लिहिलेले ही लावणी ऊर्मिला धनगर यांनी गायली आहे. संगीतकार रफिक शेख यांनी संगीतबद्ध केलेल्या या लावणीचे नृत्यदिग्दर्शन मेघा संपत यांनी केले आहे.
चित्रपटाच्या सामाजिक विषयावर या लावणीतून भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटात संस्कृती बालगुडेसह भूषण प्रधान, सारा श्रवण, आस्ताद काळे, प्राजक्ता दिघे, शेखर फडके हे कलाकार आहेत.