अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ वगळता अन्य आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, आरोपींच्या याचिकेवर निर्णय देण्याची घाई करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर चारपैकी तीन आरोपींच्या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाली. हे प्रकरण महत्त्वाचे असून त्याचा अन्य प्रकरणांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोपींच्या याचिकेवर निर्णय देण्याची घाई करणार नाही, असे न्यायालयाने सुनावणी तहकूब करताना स्पष्ट केले. तसेच अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना एनसीबीची बाजू मांडण्याचे आदेश दिले.