अंबर हडप लिखित आणि गणेश पंडित दिग्दर्शित ‘बीपी’ हे नाटक आता १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलेही पाहू शकणार आहेत. भद्रकाली प्रॉडक्शनने सादर केलेल्या ‘बीपी’ नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून ‘सर्वासाठी’ म्हणून तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणपत्राची मुदत ३१ डिसेंबपर्यंत आहे.
काही वर्षांपूर्वी एकांकिका स्पर्धेत सादर झालेली ‘बीपी’ एकांकिका खूप गाजली. याच एकांकिकेवर ‘बीपी’-बालक-पालक’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला आणि तोही गाजला. पौगंडावस्थेतील मुलांच्या लैंगिक भावना, त्या वयातील या विषयाबाबतचे कुतूहल, त्यांचे विश्व, मुलांना समजून घेणे असा विषय यात मांडण्यात आला आहे. चित्रपटाला ‘ए’ (प्रौढांसाठी) असे प्रमाणपत्र नसल्याने चित्रपट पालकांबरोबरच लहान मुलेही पाहू शकली होती. मात्र नाटकाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्याने ज्या वयोगटातील मुलांसाठी हे नाटक केले आहे ती मुलेच ते पाहू शकत नव्हती.  नाटकाचे लेखक अंबर हडप यांनी परिनिरीक्षण मंडळाकडे या नाटकाचा विषय त्या वयातील मुलांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ‘ए’ प्रमाणपत्राऐवजी ते ‘सगळ्यां’साठी असावे, अशी विनंती केली होती. परिनिरीक्षण मंडळाने नाटकातील कोणताही भाग न वगळता नाटकाचे प्रयोग सगळ्यांसाठी खुले केल्याचे पत्र हडप यांना पाठवले आहे. नाटकाचा विषय सामाजिक आहेच, पण वयात येणाऱ्या आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठीही तो तेवढाच महत्त्वाचा आहे. नाटकाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हे नाटक मुलांपर्यंत पोहोचले नव्हते. आता सगळ्यांसाठी म्हणून तात्पुरते प्रमाणपत्र मिळाल्यामुळे पालक आणि पाल्य एकत्र हे नाटक पाहू शकतील आणि हा विषय मुलांपर्यंतही पोहोचेल, असे भद्रकाली प्रॉडक्शनचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी