बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी २६ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी नुसरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण या बाळाच्या वडिलांचे नाव काय?, हे बाळ निखिल जैनचे आहे की यश दासगुप्ताचे? अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता बाळाच्या वडिलांचे नाव समोर आले आहे.

कोलकाता महानगरपालिकेच्या कागदपत्रांनुसार, नुसरत जहाँ यांनी मुलाचे नाव इशान जे. दासगुप्ता असे ठेवले आहे. इशानच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव देबाशिस दासगुप्ता असे लिहिण्यात आले आहे. देबाशिस हे यश दासगुप्ताचे खरे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसरत आणि यश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण यश किंवा नुसरत यांनी उघडपणे यावर वक्तव्य केले नाही.

Photos: सोनाली कुलकर्णीचे दुबईतील आलिशान घर पाहिलेत का?

nusrat jahan, nusrat jahan films, nusrat jahan pics, nusrat jahan son, nusrat jahan son's father, nusrat jahan boyfriend, yash dasgupta,

नुसरत या नॉर्मल चेकअपसाठी २५ ऑगस्ट रोजी अभिनेता यश दासगुप्तासोबत रूग्णालयात गेल्या होत्या. पण त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी नुसरत यांनी एका मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीपूर्वी नुसरत यांनी हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘Faith Over Fear’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

२०१९ मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केले होते. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचे सांगितले. त्यामूळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती. नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असे निखिल जैन याने सांगितले होते. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचे देखील निखिल जैनने सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांनी मुलाचे नाव इशान जे दासगुप्ता ठेवल्याचे म्हटले जाते.