31 October 2020

News Flash

coronavirus : घरी राहून नुसरत जहाँ काय करत असतील? पाहा व्हिडीओ

जाणून घ्या, नुसरत जहाँ काय करत असतील

सध्या देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. तर काही सेलिब्रिटी सामान्यांप्रमाणेच घरी राहणं पसंत करत आहेत. यामध्येच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यादेखील घरीच आहेत. विशेष म्हणजे नुसरत जहाँ घरी राहून खास पद्धतीने त्यांचा वेळ व्यतीत करत आहेत. सध्या सुट्टीवर असलेल्या नुसरत या घरी राहून नेमकं काय करतायेत हे सांगणारा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या बिर्याणी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नुसरत जहाँ घरी असल्यामुळे त्या त्यांचा सगळा वेळ कुटुंबीयासाठी देत असल्याचं या व्हिडीओवरुन लक्षात येत आहे.

 

View this post on Instagram

 

Keep Calm & Add Dum to your Biriyani #quarantining

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच गर्दीची ठिकाणंदेखील बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या सगळ्याला नागरिकाही तितकाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आदेशाचं पालन करत आहे. यात नुसरत जहाँ यांचादेखील समावेश आहे. त्यादेखील घरीच आहेत. नुसरत जहाँ या तृणमुल काँग्रेसच्या खासदार असण्यासोबतच लोकप्रिय अभिनेत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर्सदेखील अफाट असल्याचं पाहायला मिळतं.  सध्या इन्स्टाग्रामवर त्यांचे २ मिलिअन फॉलोअर्स आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 3:19 pm

Web Title: nusrat jahan making biryani in quarantining ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 “टाळ्या-थाळ्या सोडून दुसरं काहीतरी सांगा”; अभिनेत्रीची मोदींवर टीका
2 गुरूला धडा शिकवून शनाया आणि राधिका उभारणार विजयाची गुढी
3 Coronavirus : ‘आमचे शेजारी करोनाग्रस्त’; अभिनेत्यानेच पसरवली अफवा, त्यानंतर…
Just Now!
X