भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धे चेहरे अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह काही चित्रपट निर्मातेही ऑस्करवारीला जाणार आहेत. बी- टाऊनच्या या प्रसिद्ध कलाकारांसोबतच निर्माते गौतम घोष, बुद्धसाहेब दासगुप्ता यांच्यासह जवळपास ७७४ व्यक्तींना अकॅडमीमध्ये जाऊन ऑस्करसाठी त्यांचं मत देण्याचं आमंत्रण दिलं आहे. पण, या सर्व कलाकारांमध्ये शाहरुख खानचं नाव मात्र नाहीये, त्यामुळे किंग खानला या यादीतून नेमकं का वगळण्यात आलं, हाच प्रश्न आता समोर येत आहे.

शाहरुखची आजवरची चित्रपट कारकिर्द आणि त्याला मिळालेलं यश पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, ऑस्करने मात्र बॉलिवूडच्या या किंगकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ५७ देशांमधील व्यक्तींना बोलवण्यात आलं आहे. ज्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, इरफान खान, वेशभूषाकार अर्जुन भसिन यांच्या नावाचा समावेश आहे. अकॅडमी अवॉर्ड्सतर्फे आमंत्रित करण्यात आल्याबद्दल काही सेलिब्रिटींनी आनंदही व्यक्त केला आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

अकॅडमीतर्फे आमंत्रित करण्यात आलेल्या व्यक्तींच्या या नव्या प्रवर्गात ३९ टक्के महिला आणि ३० टक्के नॉन- व्हाईट वर्गाला प्राधान्य देण्यात आलं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्णभेदावरुन बरंच दुमत आढळून येत असल्याचं पाहत गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे आमंत्रितांची विभागणी करण्यात येत आहे. आपल्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि नाव कमवणाऱ्या कलाकारांनाच अकॅडमीने आमंत्रित केल्याची माहिती समोर येत आहे.

VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?