22 January 2021

News Flash

Padmavati Controversy: ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील

हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

Padmaavat : एका सोहळ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिकाने चित्रपटाविषयी आपले मत मांडले. आमचे कामच त्यांना (विरोधकांना) सडेतोड उत्तर देईल, असा निर्धार तिने व्यक्त केला.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ Padmavati चित्रपट भारतातील सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक बदलांचे कारण देत निर्मात्यांकडे परत पाठवला. मात्र, ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफसी) दीपिका पदुकोणच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाला अजिबात कात्री न लावता प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला. ब्रिटनमध्ये हा चित्रपट ठरलेल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबरला प्रदर्शित होईल. त्यामुळे वादविवांदाच्या कचाट्यात सापडलेल्या ‘पद्मावती’च्या टिमला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वाचा : मालिकेचा काही भाग लीक झाल्यामुळे ​’तुझ्यात जीव रंगला’ची टीम टेन्शनमध्ये

‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप काही राजपूत संघटनांनी केला आहे. मात्र, चित्रपटाच्या टीमने सर्व आरोप धुडकावून लावले असून, कोणतेही आक्षेपार्ह दृश्य यात नसल्याचा दावा केलाय. असे असतानाही मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीसुद्धा हा चित्रपट तिथे प्रदर्शित होणार नसल्याची घोषणा काल केली.

Throwback Thursday : कपिल देव यांचे दुर्मिळ फोटो

सेन्सॉर बोर्डाने अद्याप ‘पद्मावती’ बघितला नसल्यामुळे चित्रपटाला प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. दरम्यान, ‘बीबीएफसी’ने चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता ‘१२ ए’ रेटिंग दिली आहे. या प्रमाणपत्रामध्ये चित्रपटाच्या सारांशात ‘पद्मावती’ हा हिंदी भाषिक चित्रपट असून, राजपूत राणीला मिळवण्यासाठी एक सुलतान त्यांच्या राज्यावर कशाप्रकारे आक्रमण करतो याचे ऐतिहासिक कथानक यात असल्याचे लिहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2017 10:53 am

Web Title: padmavati cleared for dec 1 release without a single cut by british censor board
टॅग Bollywood
Next Stories
1 Tujhyat Jeev Rangala : ​’तुझ्यात जीव रंगला’च्या चित्रीकरणामधील काही भाग लीक
2 मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही ‘पद्मावती’वर बंदी
3 अरेच्चा, ही तर स्वानंदी!
Just Now!
X