News Flash

अनिकेतच्या परतण्याने मानसीला मिळणार बळ, ‘पहिले न मी तुला’ एका वेगळ्या वळणावर

समर आणि अनिकेतची टक्कर

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाउनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं, सध्या ‘पाहिले न मी तुला’चं शूट गोव्या मध्ये सुरु आहे.

मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असलेला अभिनेता आशय कुलकर्णी करोना पॉझिटिव्ह असल्याने त्याने मालिकेतून थोडा ब्रेक घेतला होता, पण शो मस्ट गो ऑन म्हणत आशय नुकताच गोव्यात दाखल झालाय, अनिकेत परत येतोय. त्यामुळे आता मालिकेत बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत.

अनिकेत मानसी त्यांच लग्न झालंय हे घरी सांगणार आहेत. अनिकेत च्या येण्याने मानसी मनातून खंबीर होतेय, मनू च्या मागे लागलेल्या विक्षिप्त समरला त्याचाच भाषेत उत्तर द्यायला अनिकेत मानसी सज्ज झालेत. त्यामुळे आता समर आणि अनिकेतची टक्कर होणार हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 5:03 pm

Web Title: pahile na me tula aniket is back avb 95
Next Stories
1 अभिनेत्री उपासना सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल
2 ट्विटरच्या कारवाईनंतर कंगनाने केला वर्णद्वेषाचा आरोप, म्हणाली, “अमेरिकेला असं वाटतं की…”
3 करोनामुळे निक्की तांबोळीच्या भावाचे निधन
Just Now!
X