‘पलटन’ प्रदर्शित होऊन सहा महिने उलटले तरीही मानधन मिळालं नसल्याचा आरोप काही कलाकार आणि क्रू मेंबरनं निर्माते, दिग्दर्शक जेपी दत्तांवर केला आहे. जेपी दत्तांचं या क्षेत्रातलं नाव, त्यांचं वय याचा मान ठेवत आम्ही अंधपणे त्यांच्यावर विश्वास ठेवला मात्र सहा महिने उलटूनही आम्हाला पैसे मिळाले नसल्याचा आरोप कलाकरांचा आहे.
अभिनेता गुरमीत चौधरीनं देखील मानधन थकवल्याचा आरोप जेपी दत्तांवर केला आहे. मला आणि माझ्या मेक अप आर्टिस्टला मानधन मिळालं नाही अशी माहिती गुरमीतनं एका वृत्तपत्राला दिली आहे.
या चित्रपटात विरोधी भूमिकेत असलेल्या डॉ. चिएन हो लिओ यांनी देखील मानधन न मिळाल्याचा आरोप केला आहे. जेपी दत्ता हे बॉलिवूडमधलं मोठं प्रस्थ आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी काम करायला तयार झालो. आमचा मानधनाबाबत तोंडी करार झाला होता. मात्र माझं अर्ध मानधन थकलं आहे. मला प्रत्येक वेळी जेपी दत्तांच्या कार्यलयात खेपा माराव्या लागत आहेत. मात्र मला माझे पैसे मिळाले नाही असं चिएन म्हणाले.
तर या चित्रपटाचा मेकअपमननंही ९० हजार रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. मात्र जेपी दत्ता यांची मुलगी निधीनं हे आरोप फेटाळले आहे. सप्टेंबरमध्ये झी स्टुडिओकडून पैसे देण्यात आले होते. प्रत्येकाला ऑफिस कुठे आहे हे ठावूक आहे. पण अद्यापही एकानंही थकित मानधनाबद्दल विचारायला आम्हाला फोन केला नसल्याचं तिचं म्हणणं आहे.