बहुप्रतिक्षित व बहुचर्चित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. पानिपत येथे झालेल्या पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यादरम्यान झालेल्या पानिपतच्या युद्धासंदर्भात हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. आज (मंगळवारी) दुपारी बारा वाजता गोवारीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या सिनेमाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली. संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमामध्ये आहे. मात्र अनेकांना या ट्रेलरमध्ये सदाशिवरावांच्या भूमिकेत दिसणार अर्जुन कपूर खटकला आहे. अनेकांनी थेट गोवारीकर यांनी ट्विट केलेल्या ट्रेलरच्या ट्विटवर प्रतिक्रिया देऊन या निवडीसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

नेहमीप्रमाणे अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात गोष्ट मांडणाऱ्या गोवारीकरांनी पुन्हा तसाच भव्यदिव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणल्याचे ट्रेलरची सुरुवात पाहताच लक्षात येते. या ट्रेलरमध्ये सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिकेत दिसणार आहेत. या ट्रेलरमधील भव्यदिव्यपणा डोळे दिपवून टाकणार आहे. ट्रेलरमधील संवादही दमदार आहेत. असं असलं तरी अनेकांना सदाशिवरावांच्या भूमिकेतील अर्जुन खटकला आहे. अर्जुनऐवजी अन्य अभिनेत्याचा विचार गोवारीकर यांनी करायला हवा होता, अर्जुनमुळे सिनेमा पडणार अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर दिल्या आहेत.

दुसरं कोणाला तरी घ्यायलं हवं होतं

तो योद्धा नाही वाटत

प्रमुख अभिनेता दुसरा हवा होता

अर्जुनचं ठाऊक नाही पण…

रणवीरला का नाही घेतलं

स्टुडंट ऑफ द इयर थ्री

कोणीही चाललं असतं पण

अर्जुनने निराशा केली

चांगला विषय पण

अर्जुन का?

अर्जुनच करणार पानिपत

दरम्यान, या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहे. २०१६ मध्ये ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर आता त्यांचा ‘पानिपत’ प्रदर्शित होणार आहे. ‘मोहेंजोदारो’ने बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई केली नव्हती. मात्र ‘पानिपत’कडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने संगीत दिले आहे.

येत्या ६ डिसेंबर रोजी हा ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.