करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु लॉकडाउनच्या तिसऱ्या पर्वात दारुची दुकानं सुरु करण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयावर दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम झुगारुन दारुच्या दुकानांना परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न त्याने सरकारला विचारला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – प्रियांका चोप्राच्या काकाला पोलीस कॉलनीमध्ये गुंडांनी चाकू दाखवून लुटलं

“या प्राणघातक विषाणूमुळे मंदिर, मस्जिद, चर्च अगदी सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली आहेत. कारण या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पाळणं शक्य नव्हतं. परंतु दारुच्या दुकानांना परवानगी कशी मिळाली. तिथे कुठे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत?” अशा आशयाचे ट्विट पवनने केले आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “लॉकडाउनमुळे कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटतेय”; अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

पवन कल्याण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो मुक्तपणे व्यक्त होताना दिसतो. यावेळी त्याने थेट केद्र सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.