मनुष्याने कितीही प्रगती केली तरी स्री-पुरुष समानता हा विचार त्याला खऱ्या अर्थाने अद्याप समाजात रुजवता आलेला नाही. त्यामुळेच आता विविध क्षेत्रातील स्त्रिया स्वत:हून पुढे येत पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात आवाज उठवत आहेत. या चळवळीला आज पण ‘#मी टू’ या नावाने ओळखतो. प्रथम सिनेक्षेत्रातून सुरु झालेली ही चळवळ आता खेळ, राजकारण, कोर्पोरेट अशा विविध क्षेत्रात पोहोचली आहे. अनेक सर्वसामान्य स्त्रिया स्वत:हून पुढे येत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक, मानसिक, कौटुंबीक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने या चळवळीची खिल्ली उडवली होती. स्वत:वर झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या या अभिनेत्रीने #me too चळवळीला विरोध केला होता.

अवश्य पाहा – “जबरदस्तीने ड्रग्ज देऊन सुशांतची हत्या केली”; बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागला समन्स देखील बजावलं. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. परंतु पायल पोलिसांच्या चौकशीवर समाधानी नाही. स्त्रियांवर अन्याय होतोय आणि पोलीस मात्र काहीच करवाई करत नाही, असे आरोप ती सातत्याने करत आहे. आरोप करताना ती सतत #me too या चळवळीचा दाखला देतेय. परंतु लक्षवेधी बाब म्हणजे याच चळवळीला पायल घोषने कधीकाळी विरोध केला होता. “काही अभिनेत्री प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे पब्लिसिटी स्टंट करतायेत.” अशा आशयाचे ट्विट तिने काही वर्षांपूर्वी केले होते. तिच्या या जुन्या ट्विट्सचे स्क्रिन शॉट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतर अभिनेत्रींच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करणारी पायल आता मात्र स्वत:च #me too चळवळीचा आधार घेतेय, अशी टीका तिच्यावर केली जात आहे.

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

नेटकऱ्यांच्या या टीकेवर पायलने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. “माझे काही ट्विट्स #me too चळवळीच्या वेळी माझ्या मॅनेजर आणि कुटुंबीयांकडून डिलिट करण्यात आले होते. ‘मीटू इंडीया’चं नाव बदलून मी दुसरं काही तरी ठेवणार आहे. कारण ‘मी टू इंडिया’ फेक आहे. काही बड्या लोकांचा यावर प्रभाव आहे” अशा आशयाचं ट्विट करत तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.