07 August 2020

News Flash

यशराजच्या कास्टिंग डायरेक्टरवर पायल रोहतगीचे आरोप; एका भेटीसाठी घेतले इतके रुपये

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची मुंबई पोलिसांकडून करण्यात आली चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काही निर्माते, दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर हे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. बॉलिवूडमधली घराणेशाही, गटबाजी, मक्तेदारी यांसाठी त्यांना जबाबदार ठरवलं जात आहे. अशातच अभिनेत्री पायल रोहतगी हिने यशराज फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरवर धक्कादायक आरोप केले आहेत.

पायलने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने यशराज फिल्म्स आणि त्यांचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मावर आरोप केले आहेत. शानू शर्मा फक्त एका भेटीसाठी तिच्याकडून पाच हजार रुपये घेतल्याचा खुलासा यात केला आहे.

“अनेकजण मला माझ्या अनुभवाविषयी विचारत होते. तर आज मी तुम्हाला त्याबद्दल सांगू इच्छिते. मुंबई पोलीस ज्या लोकांची चौकशी करत आहेत, त्यात शानू शर्माचंही नाव आहे. यशराज फिल्म्सचा तो कास्टिंग डायरेक्टर आहे. मी जेव्हा छोट्या बजेटच्या चित्रपटांकडून मोठ्या बजेटच्या चित्रपटांकडे वळत होती, तेव्हा शानू शर्माने मला भेटण्यास साफ नकार दिला होता. त्यानंतर सुद्धा मी त्यांच्याशी भेटण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी माझ्याकडून एका भेटीसाठी पाच हजार रुपये घेतले होते. ज्यांनी थोडंफारच काम केलंय, त्यांच्यासोबत हे कास्टिंग डायरेक्टर असे वागू शकतात, तर इंडस्ट्रीमध्ये तर इतर लोकांसोबत अजून काय काय करत असतील”, असा सवाल तिने उपस्थित केला.

पायलला तिचा पोर्टफोलिओ यशराज फिल्म्सकडे द्यायचा होता. त्यासाठी तिने शानू शर्माची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या एका भेटीसाठी तिला पाच हजार रुपये मोजावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 4:34 pm

Web Title: payal rohatgi allegation on yash raj films casting director ssv 92
Next Stories
1 ‘आज ते माझ्यासोबत नाहीत,पण..’; गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना संजय दत्त भावूक
2 सुशांतची अखेरची आठवण; ‘दिल बेचारा’चं नवीन पोस्टर प्रदर्शित
3 Video : तरुणांनाही लाजवेल असा उत्साह; मिलिंद सोमणच्या आईने असा साजरा केला वाढदिवस
Just Now!
X