काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रहतोगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी पायलने थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘छ. शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शूद्र जातीत झाल्याचं’ वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे.
पायलने ट्विटरवर छ.शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही अशीच पोस्ट शेअर केली आहे.
chhatrapati shivaji maharaja was born in #shudra varna in family of farmers & by sacred thread ceremony & remarriage to his spouse made a #kshtriaya so that he could be coronated #King So people from 1 Varna could go 2 another Varna if they acquired that skill NO casteism ? pic.twitter.com/AKBjvHJ1SI
— PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM (@Payal_Rohatgi) June 1, 2019
पायलने इन्स्टाग्रामवर पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर करत छ. शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं ? असा प्रश्नही तिने विचारला आहे. तिच्या या वक्तव्यावरुन तिने थेट मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत मुक्ताफळं उधळली आहेत.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, यापूर्वीदेखील पायलने अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. पायल आतापर्यंत राजा राममोहन रॉय ,कमल हासन यांच्यावर टीका करुन चर्चेत आली आहे.