News Flash

कोण होतीस तू, काय झालीस तू

तिच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभावामुळेही ती प्रसिद्ध झाली होती.

लोकेश कुमारी ही बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडलेली आहे.

अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोला त्याचे चाहते नक्कीच एन्जॉय करत असतील. या शोच्या दहाव्या सिझनची सुरुवात अनेक ट्विस्टने झाली होती. विशेष म्हणजे या सिझनमध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांसोबत सामान्य जनतेतील स्पर्धकांचाही समावेश करण्यात आला. त्यातील काहीजण तर तुम्हाला माहितच असतील. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे लोकेश कुमारी ही बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडलेली. लोकेश तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे फार चर्चेत राहिली होती. त्यामुळे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच पण सलमानही तिच्यापासून प्रभावित झाला होता. बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती काय करतेय आणि तिचे आयुष्य कसे बदलले? याबाबत कोणालाच माहित नाही. तर सध्या ही दिल्लीची मुलगी काय करतेय हे जाणून घेऊया..

lokesh2-759

आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या लोकेशने तिच्या पद्धतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ती बिग बॉसशी बोलायची, घराच्या आत ती डान्स करायची. तसेच, तिच्या ‘हॅप्पी गो लकी’ स्वभावामुळेही ती प्रसिद्ध झाली होती. ढगळे कपडे, विस्कटलेले केस अशाप्रकारचे तिचे राहणीमान असूनही ती सलमानला आवडायची. इतकेच नव्हे तर ‘होस्ट विकेन्ड का वार’मध्येही सलमान तिच्याशी बोलायला विसरायचा नाही. मात्र, आता लोकेश खूप बदलली आहे. तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर नजर टाकल्यास पूर्वीची लोकेश तुम्हाला दिसणार नाही. ही नक्की बिग बॉसमधलीच लोकेश आहे ना.. असा प्रश्न तुम्हाला पडेल. या फोटोंमध्ये लोकेश सुंदर तर दिसतच आहे पण तिच्यातील आत्मविश्वासही यात झळकतो. तिचा हा मेकओव्हर नक्कीच सगळ्यांना धक्का देणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 9:17 am

Web Title: photos ex bigg boss 10 contestant lokesh kumaris makeover will blow your mind
Next Stories
1 सलमान, करणच्या चित्रपटात अक्षय कुमारची वर्णी
2 हिंदी सिनेमांची अश्लील गाणी सुधारण्याची मोहीम
3 मुंबईसारखे सुरक्षित आमच्याकडेही वाटावे!
Just Now!
X