चित्रपटापेक्षा नाटकच दर्जेदार असते. प्रेक्षकवर्ग नाटकांची चर्चा करतात तसे चित्रपटांच्या बाबतीत होत नाही. नाटय़ चळवळ उभी रहावी म्हणून शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने चळवळ उभी करावी. कोकणात नाटकांसाठी प्रेक्षक वर्ग आहे. ‘सही रे सही’ या नाटकातील कलाकारांचे वय वाढत आहे पण नाटक मात्र तरूण बनत आहे असे चित्रपट अभिनेता व नाटय़कलावंत भरत जाधव यांनी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सही रे सही’ नाटकाच्या निमित्ताने आलेले भरत जाधव पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आयोजक विकास पावसकर उपस्थित होते. सही रे सही नाटक येत्या १३ ते १६ मे काळात कोकणात आयोजित करण्यात आले आहे असे अभिनेता जाधव म्हणाला. आपण चित्रपटापेक्षा नाटकाला प्राधान्य देतो असे तो म्हणाला.

कोकणातील झापांची नाटय़थिएटर्स आपण पाहिली. त्या नाटय़थिएटर्समध्ये नाटके सादर करताना आनंद मिळायचा. त्या आठवणींना उजाळा देत भरत जाधव म्हणाला, कोकणातील कलाकार नाटकात सर्वाधिक आहेत. कोकणातील प्रेक्षकदेखील दर्जेदार नाटकांचा सन्मान करतो. त्याशिवाय कोकणातील वातावरणदेखील कलाकारांना भावते असे जाधव म्हणाला.

सही रे सही, दामोदर पंत अशा अनेक नाटकात काम केले. सही रे सही १४ वर्षे नाटक सुरू आहे. राज्यात या नाटकाला दाद मिळते आहे, पण कोकणातील नाटक प्रेक्षक एन्जॉय करतो असे अभिनेता जाधव म्हणाला. नाटय़ थिएटरमुळे तांत्रीक अडचणी निर्माण होतात पण प्रेक्षकांच्या प्रेमापोटी त्याकडे लक्ष देत नाही असे जाधव म्हणाला.

चित्रपटापेक्षा नाटकाची भूमिका पहिल्यापासून केली. सही रे सही नाटकामुळेच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटाना गर्दी असली तरी नाटकांचा प्रेक्षक चोखंदळ असतो असे अभिनेता भरत जाधव म्हणाला. नटसम्राट, कटय़ार काळजात घुसलीसारख्या नाटकांचे चित्रपट बनले, तसा चित्रपट सही रे सही नाटकाचा बनविण्याचा विचार नाही असे अभिनेता जाधव म्हणाला. नाटकाची कलाकृती सादर करणे व प्रेक्षकांनी दाद देणेसारखा प्रकार चित्रपटात होत नाही, असे तो म्हणाला. माझ्या चित्रपटात विविध भूमिका आहेत असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या नाटय़चळवळीला आधार मिळेल म्हणून अवलंबून राहणे योग्य नाही. उलट नाटय़ चळवळ उभी राहण्यासाठी दर्जेदार नाटकांचे सादरीकरण महत्त्वाचे आहे. मास्टर ब्लास्टर नाटक लवकरच येत आहे. त्यात माझी भूमिका आहे असे अभिनेता भरत जाधव म्हणाला.

रात्रीस खेळ चाले मालिका लोक आवर्जुन पाहत आहेत हे यश आहे. त्यामुळे टिकाटिपणी करत राहण्यापेक्षा आपल्या भागात शुटींग सुरू आहे, हा भाग जगभर पोहचत आहे. त्यामुळे निश्चितच जगभर या कलाकृतीमुळे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होईल. त्यामुळे या मालिकेकडे सकारात्मक पहावे असे अभिनेता भरत जाधव म्हणाला.

कॉमेडी एक्स्प्रेसमुळे नाटकावर परिणाम होत नाही. कोकणातील नाटय़वेडय़ा प्रेक्षकामुळेच नाटके सादर करताना आनंद मिळतो आहे असे भरत जाधव म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plays audience are finical than film says bharat jadhav
First published on: 03-05-2016 at 01:34 IST