News Flash

या तारखेला प्रदर्शित होणार ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट

PM Narendra Modi Movie: बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

'पीएम नरेंद्र मोदी'

PM Narendra Modi Movie: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. २४ मे रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात दाखवण्यात आला असून अभिनेता विवेक ओबेरॉयने पडद्यावरील मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आधी ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करु नये, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले होते. अखेर निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९ मेपर्यंत न करण्याचे आदेश दिले. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली पण त्यांना सुप्रीम कोर्टातूनही दिलासा मिळू शकला नाही. अखेर शुक्रवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. २४ मे रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 10:20 am

Web Title: pm narendra modi movie vivek oberoi starrer biopic will be released on 24th may
Next Stories
1 प्रियांका, दीपिका, साराने पटकावला ‘इन्स्टाग्रामर्स ऑफ द इअर’चा किताब
2 मतदानाचा हक्क बजावल्यानंतर या कारणामुळे पुष्कर श्रोत्री होतोय ट्रोल
3 साराच्या घरातून निघताना कार्तिकने का लपवले तोंड?
Just Now!
X